भारतात Samsung Galaxy S21 Series साठी प्री-बुकिंग सुरु, 3,849 रुपयांचं कव्हर मोफत

सॅमसंग गॅलेक्सी S21 सीरिज 14 जानेवरीला भारतात डेब्यू करत आहे. या स्मार्टफोनसाठी भारतात प्री-बुकिंग सुरु झालं आहे.

भारतात Samsung Galaxy S21 Series साठी प्री-बुकिंग सुरु, 3,849 रुपयांचं कव्हर मोफत
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 11:01 AM

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी S21 सीरिज 14 जानेवरीला भारतात डेब्यू करत आहे. या स्मार्टफोनसाठी भारतात प्री-बुकिंग सुरु झालं आहे. 2 हजार रुपयांची टोकन अमाऊंट भरुन तुम्ही हा स्मार्टफोन बुक करु शकता. युजर्स सॅमसंगची अधिकृत वेबसाईट किंवा सॅमसंग शॉपिंग अॅपद्वारे ही फ्लॅगशिप सीरिज बुक करु शकतात. (Pre-booking of Samsung Galaxy S21 Series started in India)

Galaxy S21 Series प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनी Next Galaxy VIP Pass देणार आहे. फोन खरेदी करताना प्री बुक करतेवेळी VIP Pass सबमिट करावा लागेल. त्यानंतर तुम्ही आधी भरलेले 2 हजार रूपये फोनच्या किंमतीतून वजा केले जातील. तसेच जे ग्राहक Galaxy S21 प्री बुक करतील त्यांना 3,849 रूपये किंमतीचं एक कव्हर मोफत दिलं जाणार आहे. 14 जानेवारीला रात्री 8 वाजल्यापासून प्री-बुकिंगला सुरुवात केली जाणार आहे.

Galaxy S21 सीरिज बिक्सबी व्हॉईससह सादर केली जाण्याची शक्यता आहे. हे एक बायोमेट्रिक व्हॉईस-अनलॉक फिचर आहे. सॅममोबाईलच्या एका रिपोर्टनुसार गॅलेक्सी एस 21 सीरिजमध्ये वन यूआयचं रनिंग वर्जन 3.1 लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनबाबत कंपनीने काही टिझरही जारी केले आहेत. Galaxy S21 चे काही फोटो आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले होते. यावरून ग्राहकांना या फोनमध्ये काय खास असणार याची कल्पना आली आहे. त्यामुळे या फोनबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.

Galaxy S21च्या डिझाईनमध्ये Galaxy S20 च्या तुलनेत बदल पाहायला मिळणार आहे. विषेशत: Galaxy S21 सीरिजचं कॅमेरा मॉड्यूल हे वेगळं असणार आहे. तसेच यावेळी मोबाईलमध्ये काही नवे सेन्सर्सही मिळतील. Galaxy S21 सीरिजमध्ये Qualcomm Snapdragon 888 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. परंतु कंपनी भारतातील आपल्या फ्लॅगशिप फोनमध्ये इनहाऊस Exynos प्रोसेसर देते.

दरम्यान, असी माहिती मिळाली आहे की, Samsung च्या या सीरिजमध्ये गॅलेक्सी S21, S21 प्लस आणि S21 अल्ट्रा हे तीन स्मार्टफोन असतील. या सीरिजमधील S21 अल्ट्रा हा खूप महागडा स्मार्टफोन असणार आहे, कारण हा गोल्ड एडिशन स्मार्टफोन असणार आहे.

हेही वाचा

18 मिनिटात 50 टक्के चार्ज होणार, Realme चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच

4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली

(Pre-booking of Samsung Galaxy S21 Series started in India)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.