Samsung Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 ची प्री-बुकिंग सुरू, कधी होणार लाँच जाणून घ्या
सॅमसंगच्या बहुप्रतिक्षीत असलेल्या Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 ची प्री-बुकिंग सुरू करण्यात आली आहे. 1,999 रुपयांच्या टोकन रकमेसह 31 जुलैपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली जाऊ शकते. युजर्सना कधीपासून या दोन्ही फोनची प्रतीक्षा होती. या दोन्ही फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सबाबतची बहुतेक माहिती लिक झाली होती.
मुंबई : ग्राहकांना उत्सुकता लागून राहिलेल्या सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड सीरिजच्या लाँचिंगबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. सॅमसंग 10 ऑगस्टला आपली प्रीमिअम फोन सिरीज लाँच करणार आहे. सॅमसंगचे फोल्डेबल फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 4 (Samsung Galaxy Z Fold 4) आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 4 (Samsung Galaxy Z Flip 4) हे दोन्ही स्मार्टफोन एका इव्हेंटमध्ये लाँच केले जातील, असे जाहिर केले आहे. कंपनीने या फोनच्या प्री-बुकिंगबाबत (Pre booking) अधिकृत घोषणाही केली आहे. या स्मार्टफोनबाबत ग्राहकांमध्ये अनेक दिवसांपासूनची उत्सुकता लागली होती. फोनचे काही फीचर्स आधीच लिक झाले होते. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अजून नवीन काय मिळणार, याचा तर्क ग्राहकांकडून लावण्यात येत होता. दरम्यान, ग्राहक हे फोन 31 जुलैपासून म्हणजे आजपासूनच प्री-बुक करू शकता. सॅमसंगच्या या प्री-बुकिंग ऑफर, इव्हेंट आणि या फोन्सबद्दल जाणून घेऊया.
काय आहे ऑफर?
सॅमसंग 10 ऑगस्ट रोजी आपले प्रीमिअम फोन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 लाँच करणार आहे. कंपनीचा लाँचिंग इव्हेंट 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल. सॅमसंगमध्ये या फोनच्या प्री-बुकिंगची माहिती लाइव्ह करताना, 31 जुलैपासून सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून 1,999 रुपयांच्या टोकन रकमेसह प्री-बुकिंग करता येईल. जे युजर्स 1,999 रुपयांच्या टोकन रकमेसह प्री-बुक करतील अशांना, फोन खरेदी केल्यावर सॅमसंगकडून 5,000 रुपयांचे अतिरिक्त फायदे देखील मिळतील.
Samsung Galaxy Z Fold 4 आणि Flip 4 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगचा हा फोन प्रीमिअम डिझाइन आणि दमदार फीचर्ससह येणार आहे. हे फोन नवीन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतात. लिक्स झालेल्या माहितीनुसार, हे फोन मल्टिपल कलर व्हेरिएंटमध्ये लाँच केले जातील, यामध्ये इन-डिसप्ले फ्रंट कॅमेरा देखील मिळू शकतो. तसेच सॅमसंग फोल्डिंग डिस्प्लेची फ्रेम देखील बदलू शकते. या फोनमध्ये सॅमसंग एस-पेन देखील सपोर्ट केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.