Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘What’sapp Hack’ होण्यापासून वाचवा, कधीही करू नका ‘या’ चूका; नाहीतर.. सगळे पर्सनल फोटो आणि चॅट होतील लीक !

व्हॉट्सअॅप जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. चॅटपासून व्हिडिओ कॉलिंगपर्यंत, आपण दिवसभरात खूप वेळ यावर घालवतो. यामध्ये आपली अनेक वैयक्तिक माहिती सेव्ह केली जाते, परंतु तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे ती हॅकही होऊ शकते. तुमचे WhatsApp सुरक्षित कसे ठेवायचे ते जाणून घ्या.

'What'sapp Hack' होण्यापासून वाचवा, कधीही करू नका ‘या’ चूका; नाहीतर.. सगळे पर्सनल फोटो आणि चॅट होतील लीक !
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 4:00 PM

मुंबई : WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे, इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. व्हॉट्सअॅपची जबरदस्त वैशिष्ट्ये युजर्संना (Great features for users) एकमेकांशी सहजपणे कनेक्ट होऊ देतात. म्हणूनच तुमचे व्हॉट्सअॅप सुरक्षित राहणे आणि तुमच्या वैयक्तिक चॅट्स, मेसेज आणि फाइल्स पूर्णपणे सुरक्षित असणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी व्हॉट्सअॅपच्या सिक्युरिटी फीचर्सचा वापर (Use of security features) करण्यासोबतच काही खबरदारी घेऊन तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप सुरक्षित करू शकता. तुमचे WhatsApp अधिक सुरक्षित करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. व्हॉट्सअॅपवर आलेल्या, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका व्हॉट्सअॅपवर अनेकदा लॉटरी, रिचार्ज किंवा इतर आकर्षक ऑफर्सचे मेसेज येतात. या संदेशांमध्ये काही लिंक्स असतात, ज्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. अशा अनोळखी लिंक्सबाबत सावधगिरी बाळगणे (Be careful) अत्यंत आवश्यक आहे कारण अशा लिंकवर क्लिक केल्यास तुमचे व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकते.

लिंकद्वारे होतो व्हॉट्सअॅप हॅक

व्हॉट्सअॅपवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी. तुम्ही स्कॅन URL, फिशटँक, नॉर्टन सेफ वेब इत्यादी साइट्सना भेट देऊन लिंक तपासू शकता. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन WhatsApp युजर्संना चॅट दरम्यान एंड-टू-एंड एन्क्रिप्शन करण्याची अनुमती देते. यासह, दोन व्हॉट्सअॅप युजर्संमधील संभाषण सुरक्षित राहते. व्हॉट्सअॅप देखील तुमचे मेसेज वाचू शकत नाही. तुमच्या WhatsApp मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन तपासण्यासाठी, तुमचा संपर्क उघडा आणि त्याच्या संपर्क माहितीवर जा. आता स्क्रीनवर “एनक्रिप्शन” वर टॅप केल्यानंतर, तुम्ही QR कोड आणि 60 अंकी क्रमांक पाहू शकता.

प्रायव्हसी सेटिंग्जचा लाभ घ्या

WhatsApp आपल्या युजर्संना प्रायव्हसी संरक्षण करण्यासाठी अनेक पर्याय देते. त्यांचा प्रोफाईल फोटो, स्टेटस आणि इतर माहिती कोण पाहू शकते हे युजर्स सहजपणे ठरवू शकतात. सेटिंग फक्त कॉन्टॅक्टमध्ये बदलणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. याच्या मदतीने तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेले कॉन्टॅक्टच तुमचा प्रोफाईल फोटो, स्टेटस आणि इतर माहिती पाहू शकतील.

हे सुद्धा वाचा

व्हॉट्सअॅपवर फिंगरप्रिंट लॉक ठेवा

अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंट लॉकचा पर्याय उपलब्ध आहे. फिंगरप्रिंट लॉक सक्षम करण्यासाठी, WhatsApp च्या सेटिंगवर जा. सेटिंग्जमध्ये जा आणि खाते निवडा आणि नंतर गोपनीयता निवडा. गोपनीयता विभागाच्या तळाशी असलेल्या फिंगरप्रिंट लॉक पर्यायावर टॅप करा. येथे तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंटची नोंदणी करावी लागेल. यानंतरच तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप वापरू शकाल.

टू स्टेप व्हेरिफिकेशन

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सना टू स्टेप व्हेरिफिकेशन सुविधाही देते. या पर्यायाने तुम्ही WhatsApp आणखी सुरक्षित करू शकता. टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करण्यासाठी, WhatsApp सेटिंग्जवर जा आणि खाते निवडा. आता स्क्रीनवरील टू स्टेप व्हेरिफिकेशनवर टॅप करून ते सक्षम करा. येथे तुम्हाला 4 अंकी पिन सेट करावा लागेल आणि योग्य ईमेल पत्ता द्यावा लागेल

तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे काम करा

तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुम्हाला तुमचे सिम देखील गमवावे लागते. अशा स्थितीत लगेच तुमच्या नंबरचे दुसरे सिम घ्या आणि दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करा. असे केल्याने OTP सहज येईल आणि तुम्ही नवीन फोनमध्ये WhatsApp चालवू शकाल. तुम्ही नवीन फोनवर लॉग इन करताच, पूर्वीच्या फोनवरून व्हॉट्सअॅप लगेच लॉग आउट होईल.

व्हॉट्सअॅप वेबवरून लॉग आउट करायला विसरू नका

काही युजर्स त्यांचे व्हॉट्सअॅप त्यांच्या कॉम्प्युटरवर किंवा ऑफिसमध्ये लॅपटॉपवर उघडे ठेवतात. ही सवय युजर्संना मोठा त्रास देऊ शकते. कारण त्याच सिस्टीमवर बसलेला दुसरा कोणी उघडलेल्या व्हॉट्सअॅपवर तुमच्या चॅट पाहू शकतो आणि तुम्हाला कळणारही नाही. म्हणूनच तुम्ही नेहमी व्हॉट्सअॅप वेबमधून लॉग आउट केले पाहिजे.

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.