फुकटचं वायफाय वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचा

मुंबई : रेल्वे स्टेशन असो वा बस स्टँड सगळीकडे वायफाय सध्या मोफत झालं आहे. हे वायफाय जरी सुरक्षित असलं तरी सार्वजनिक ठिकाणी फुकटचं वायफाय वापरे टोळके तुम्ही पाहिले असतील. पण, या टोळक्यांनी आता सावध होण्याची गरज आहे. स्मार्टफोन युजर्स सहजतेने ‘वायफाय’च्या(Wi-Fi) माध्यामातून फुकटच्या डेटाचा वापर करतात. मात्र, हेच फुकटचं इंटरनेट तुम्हाला अडचणीत आणू शकतं. या […]

फुकटचं वायफाय वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : रेल्वे स्टेशन असो वा बस स्टँड सगळीकडे वायफाय सध्या मोफत झालं आहे. हे वायफाय जरी सुरक्षित असलं तरी सार्वजनिक ठिकाणी फुकटचं वायफाय वापरे टोळके तुम्ही पाहिले असतील. पण, या टोळक्यांनी आता सावध होण्याची गरज आहे. स्मार्टफोन युजर्स सहजतेने ‘वायफाय’च्या(Wi-Fi) माध्यामातून फुकटच्या डेटाचा वापर करतात. मात्र, हेच फुकटचं इंटरनेट तुम्हाला अडचणीत आणू शकतं. या फुकटच्या वायफायच्या भानगडीत तुमचा स्मार्टफोन कधीही हॅक होऊ शकतो. त्यामुळे या पुढे जर तुम्हाला ओपन वायफाय मिळत असेल तर त्या पासून सावध राहा.

एखादं ओपन वायफाय वापरल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनचा मॅक अॅड्रेस आणि आयपी अॅड्रेस त्या वायफायच्या राऊटरमध्ये रजिस्टर होतो. त्यामुळे हॅकर्सला तुमचा स्मार्टफोन हॅक करणं सोपं होतं. ‘स्निफिंग टूल’च्या माध्यमातून हॅकर्स तुमचा स्मार्टफोन हॅक करतो.

हॅकिंगपासून सुरक्षित कसं राहाल?

नेटवर्किंगमधील एसएफआयडी (सव्हिर्स फेट आय डेंटीफाय) ब्रॉडकास्ट थांबवणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे एखाद्या हॅकरला स्मार्टफोन डिटेक्ट करणे कठीण होतं.

प्रत्येक स्मार्टफोनला एक युनिक आयडी दिलेला असतो, तो युनिक अॅड्रेस सेटिंग अॅक्टिव्हेट केल्यानंतर हॅकर्सला स्मार्टफोन हॅक करता येत नाही.

डब्ल्यूईपी (वायर इक्व्हिव्हॅलंट प्रायव्हसी) ही सेटिंग सुरू केल्यानंतर, ओपन वायफाय वापरल्यास स्मार्टफोन हॅक होण्याची शक्यता कमी होते.

या टिप्स वापरून तुम्ही तुमचा स्मार्टफोन हॅकिंगपासून सुरक्षित ठेवू शकतात. मात्र, नेहमीच फुकटचा डेटा वापरणं कुठवर योग्य आहे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.