6000mAh बॅटरीसह Realme 14T 5जी लाँच, Nothing Phone 2a शी होईल स्पर्धा
Nothing, Poco आणि Motorola सारख्या ब्रँडशी स्पर्धा करण्यासाठी, Realme ने मध्यम श्रेणीच्या सेगमेंटमध्ये नवीन Realme 14T 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन किती किमतीत लाँच करण्यात आला आहे आणि या हँडसेटमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध असतील? हे आपण आजच्या या लेखात जाणुन घेऊयात...

रिअलमीने मध्यम रेंज असलेल्या सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉंच केला आहे. ग्राहकांना परवडणार असा रिअलमी कंपनीने त्यांचा रिअलमी 14टी 5जी हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तसेच या फोनच्या महत्त्वाच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन पॉवरफूल 6000mAh बॅटरी, व 50 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक प्रोसेसर आणि AMOLED डिस्प्ले सारख्या फिचर्ससह लाँच करण्यात आला आहे. तर आता तुम्हाला सुद्धा या फोनची किंमत किती आहे, विक्री कधी सुरू होईल आणि या फोनमध्ये कोणते खास फीचर्स उपलब्ध असतील? तर आजच्या लेखात या फोनबद्दल सर्व काही जाणून घेऊयात…
Realme 14T 5G स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या नवीनतम Realme फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा फोन 2100 निट्स पीक ब्राइटनेस आणि 180 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटसह येतो.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा Realme फोन 6nm आधारित ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर वापरण्यात आलेले आहेत.
कॅमेरा सेटअप: या Realme मोबाईलच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, तसेच 2-मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. एआय फीचर्ससोबतच, हा फोन लाईव्ह फोटो फीचरला देखील सपोर्ट करतो.
बॅटरी क्षमता: या फोन मध्ये एक पॉवरफूल अशी 6000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45 W सुपरVOOC चार्ज सपोर्टसह येते.
कनेक्टिव्हिटी: 5जी सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ व्हर्जन 5.3, जीपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. याशिवाय, सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.
Don’t just look — experience it. #realme14T5G with brightest AMOLED display in it’s class — vivid, sharp, sun-ready. #SuperBrightSuperLasting
Sale is Live! Starting at ₹16,999*
Buy now on https://t.co/HrgDJTHBFX & @Flipkart https://t.co/w3pMYqWAyL https://t.co/s4WewxcE2n pic.twitter.com/f2FfgtEpW4
— realme (@realmeIndia) April 25, 2025
Realme 14T 5G ची भारतातील किंमत
या Realme मोबाईलच्या 8 जीबी / 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे परंतु जर तुम्ही या हँडसेटचा 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट खरेदी केला तर तुम्हाला 19,999 रुपयांना हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. तर कंपनीच्या अधिकृत साइटव्यतिरिक्त, हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
या स्मार्टफोनला देणार टक्कर
या किंमतीच्या रेंजमध्ये Realme कंपनीचा हा फोन Motorola G85 5G, Nothing Phone 2a 5G आणि Poco X7 5G सारख्या स्मार्टफोनला टक्कर देणार आहे. या तिन्ही स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे.