Realme च्या सर्वात स्वस्त 5G फोनचा आज पहिला सेल, 8GB/128GB सह ढासू फीचर्स मिळणार

Realme 8 5G हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला. आज कंपनीने या फोनचा पहिला सेल आयोजित केला आहे.

Realme च्या सर्वात स्वस्त 5G फोनचा आज पहिला सेल, 8GB/128GB सह ढासू फीचर्स मिळणार
Realme 8 5G
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 4:39 PM

मुंबई : Realme 8 5G हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतात लाँच करण्यात आला. आज कंपनीने या फोनचा पहिला सेल आयोजित केला आहे. Realme चा हा फोन 90Hz डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्शन 700 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा तसेच एक होल-पंच डिस्प्ले आहे. (Realme 8 5G Smartphone first sale live on Flipkart from today; check price and specs)

Realme 8 5G हा स्मार्टफोन Realme 8 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे, जो गेल्या महिन्यात Realme 8 Pro सह भारतात लाँच झाला होता. हा स्मार्टफोन 128 जीबी पर्यंतच्या ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो आणि यात डायनॅमिक रॅम एक्सपेंशन (डीआरई) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जो बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Realme 8 5G के स्पेसिफिकेशन्स

  • ड्युअल-सिम (नॅनो) Realme 8 5G Android 11 वर Realme UI 2.0 वर चालतो आणि त्यात 90Hz रीफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा फुल-एचडी + (1,080 × 2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • फोनमध्ये डीआरई तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे जो स्मूद मल्टीटास्किंगसाठी बिल्ट-इन स्टोरेजला व्हर्च्युअल रॅममध्ये रूपांतरित करतो.
  • स्मार्टफोनमध्ये एफ / 1.8 लेन्ससह 48 मेगापिक्सेल सॅमसंग GM1 प्रायमरी सेन्सर, एफ / 2.4 पोर्ट्रेट लेन्ससह 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि एफ / 2.4 मॅक्रो लेन्ससह 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
  • रियर कॅमेरा सेटअपला नाईटस्केप, 48M मोड, प्रो मोड, AI स्कॅन आणि सुपर मॅक्रोसारखे फीचर्स जोडलेले आहेत.
  • सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी या Realme 8 5G फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यामध्ये f / 2.1 लेन्सचा वापर करण्यात आला आहे. या फ्रंट कॅमेरामध्ये पोर्ट्रेट, नाइटस्केप आणि टाइमलॅप्स फीचर देण्यात आलं आहे.

Realme 8 5G ची किंमत

भारतात Realme 8 5G या स्मार्टफोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट मिळेल. फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज पर्यायसुद्धा सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत 16,999 रुपये इतकी आहे. Realme 8 5G च्या कलर ऑप्शन्समध्ये सुपरसॉनिक ब्लॅक आणि सुपरसॉनिक ब्लूचा समावेश आहे. फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांमार्फत आज (29 एप्रिल) दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन देशात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

इतर बातम्या 

64MP कॅमेरासह Redmi चा पहिला गेमिंग स्मार्टफोन लाँच, किंमत…

8GB/128GB, 48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँच

6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, Moto G60 आणि Moto G40 चा सेल सुरु

(Realme 8 5G Smartphone first sale live on Flipkart from today; check price and specs)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.