लाँचिंगपूर्वीच Realme 8 5G चे फीचर्स लीक, या स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Realme 8 5G लाँच करणार आहे. (Realme 8 5G specification leaked)

लाँचिंगपूर्वीच Realme 8 5G चे फीचर्स लीक, या स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?
Realme 8 5G
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 7:02 AM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme लवकरच थायलंडमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Realme 8 5G लाँच करणार आहे. हे डिव्हाईस 21 एप्रिलला लाँच करण्यात येणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. तथापि, फोन लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या फोनचे काही फीचर्स टीझ केले आहेत. (Realme 8 5G specification leaked before its launch, know more about it)

रियलमी थायलंडने आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर फोनचा टीझर शेअर केला आहे. या शेअर केलेल्या टीझरमध्ये हा स्मार्टफोन 6.5 इंचांच्या पंच होल डिस्प्लेसह येणार असून यात 90Hz चा रिफ्रेश रेट मिळेल, अशी माहिती कंपनीनकडून देण्यात आली आहे. या टीझरमध्ये असेही म्हटले आहे की, या स्मार्टफोनमध्ये डाव्या बाजूला सिम कार्ड ट्रे देण्यात येणार आहेत.

दुसर्‍या टीझरमध्ये असे म्हटले आहे आहे की, Realme 8 5G स्मार्टफोन 8.5mm पातळ असेल आणि त्याचे वजन 185 ग्रॅम इतकं असेल. हा स्मार्टफोन साइड-माऊंट फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल जो उजव्या बाजूला दिला जाईल. यासह, या फोनच्या खालच्या बाजूला 3.5mm हेडफोन जॅक असेल.

5000mAh क्षमतेची बॅटरी

टीझरमध्ये दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल आणि यात ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 5G (octa-core MediaTek Dimensity 700 5G) प्रोसेसर असेल. हा फोन सुपरसॉनिक ब्लॅक आणि सुपरसॉनिक ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येईल.

ट्रिपल कॅमेरा सेटअप

हा फोन नुकताच गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमध्येदेखील आढळला होता, ज्यामुळे Realme 8 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित रिअलमी यूआय वर चालणार असल्याचे समोर आले आहे. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर उपलब्ध असेल. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

भारतात कधी लाँच होणार?

Realme कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच करु शकते. अलीकडेच फ्लिपकार्टने भारतात Realme 8 5G स्मार्टफोन लॉन्चिंगबाबत टीझ केलं होतं. अद्याप कंपनीने या फोनची लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही.

इतर बातम्या

Flagship Fest Sale : Iphone 11, Motorola Razr 5G सह Vivo-Oppo च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट

8GB RAM, 48MP कॅमेरा, अवघ्या 849 रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन

(Realme 8 5G specification leaked before its launch, know more about it)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.