Realme 8 series मधील दोन ढासू स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने (Realme) आज भारतात Realme 8 Series चे दोन स्मार्टफोन Realme 8 Pro आणि Realme 8 लॉन्च केले आहेत.
मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने (Realme) आज भारतात Realme 8 Series चे दोन स्मार्टफोन Realme 8 Pro आणि Realme 8 लॉन्च केले आहेत. रियलमी 8 सिरीज फुल-एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह लॉन्च करण्यात आली आहे आणि दोन्ही स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रायमरी सेन्सरसह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. (Realme 8 series launched with two smartphones, check price and features)
कंपनीने दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये Realme 8 Pro लॉन्च केला आहे, तर रिअलमी 8 तीन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. याशिवाय रिअलमी 8 प्रो मध्ये तीन कलर ऑप्शन्स आणि रिअलमी 8 मध्ये दोन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यासह कंपनीने स्मार्टस्केल, स्मार्ट बल्ब आणि रियलमी बड्स एअर 2 देखील लॉन्च केले आहेत.
Realme 8 Pro आणि Realme 8 च्या किंमती
रियलमी 8 प्रो च्या 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये असून 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. इनफायनाइट ब्लॅक आणि इनफायनाइट ब्लू कलर पर्यायांसह हे स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याच वेळी, त्याचे इलुमिनाटिंग येलो व्हेरिएंट लवकरच उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त, रियलमी 8 च्या 4 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे, 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन सायबर ब्लॅक आणि सायबर सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध असेल.
या स्मार्टफोन्सची विक्री 25 मार्च (आज) रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, रियलमीची वेबसाइट आणि मेनलाइन स्टोअरवर सुरू होईल. 10 टक्के सवलतीत तुम्ही हे स्मार्टफोन खरेदी करु शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला आयसीआयसी आय बँकेचं क्रेडिट कार्ड वापरावं लागेल किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शन करावं लागेल.
Realme 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स
हा ड्युअल नॅनो सिम स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी यूआय 2.0 वर चालतो. यात 6.4 इंचाचा फुल एचडी + (1,080 × 2,400 पिक्सेल) सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल जो 90.8 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि 1000 एनआयटी पीक ब्राइटनेस आणि 180 हर्ट्ज सॅम्पलिंग रेटसह येतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720 जी एसओसी (Qualcomm Snapdragon 720G SoC) सपोर्टेड आहे, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे, जी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवली जाऊ शकते.
फोटो आणि व्हिडीओंसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्राइमरी सेन्सर 108 मेगापिक्सलचा आहे. या व्यतिरिक्त 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर देण्यात आला आहे. यासह, आपल्याला सेल्फीसाठी एक 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो पंचहोल कटआउटमध्ये फिट करण्यात आला आहे.
या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला ड्युअल-बँड Wi-Fi, 4G, Bluetooth v5.0, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. सेन्सरबद्दल बोलायचे झाले तर त्यामध्ये एम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेंसर, मॅग्नेटिक इंडक्शन सेन्सर, एक्सेलेरोमीटर, गायरो मीटर सेंसर इत्यादी दिले आहेत. याशिवाय यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 4,500mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 50W SuperDart चार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. मनोरंजक गोष्ट अशी आहे की त्याच्या बॉक्समध्ये आपल्याला 65W जलद चार्जर मिळेल. Realme 8 Pro चा आकार 160.6×73.9×8.1mm इतका आहे आणि त्याचे वजन 176 ग्रॅम आहे.
✅ 108MP Infinite Clarity Camera ✅ 50W SuperDart Charge ✅ 16.3cm(6.4’’) Super AMOLED Fullscreen ✅ 8.1mm & 176g Super Slim & Light ✅ Snapdragon 720G Processor
Everything you need for a premium smartphone experience, starting from INR 17,999
#realme8Pro #108MPCaptureInfinity pic.twitter.com/X2NjER8OWt
— Madhav108MP (@MadhavSheth1) March 25, 2021
Realme 8 चे स्पेसिफिकेशन्स
Realme 8 Pro च्या तुलनेत या स्मार्टफोनमध्ये काही गोष्टी कमी असतील. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी 95 एसओसी (octa-core MediaTek Helio G95 SoC) पावर्ड फोन असेल. यात 8 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज स्पेस आहे जी मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवू शकतो.
या फोनमध्येही तुम्हाला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये प्राइमरी सेन्सर 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अॅन्ड व्हाइट सेन्सर असेल. याशिवाय सेल्फीसाठीही या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.
या फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये तुम्हाला रियलमी 8 प्रो सारखे सेन्सर आणि कनेक्टिव्हिटी सुविधा मिळतील. तथापि, या फोनमध्ये आपल्याला 5000mAh ची मोठी बॅटरी मिळेल, जी स्लोव्हर 30W डार्ट चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. त्याच वेळी, एक सपोर्टेड चार्जर देखील त्याच्या बॉक्समध्ये मिळेल.
Redmi Note 9 सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट, कमी किंमतीत ढासू फीचर्स मिळणार https://t.co/iYdhFjN3NI #RedmiNote9 |
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 23, 2021
इतर बातम्या
जबरदस्त कॅमेरा, 256GB स्टोरेजसह OnePlus 9 आणि 9 Pro बाजारात, किंमती…
मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा
48MP कॅमेरावाला नवीन Redmi Note 10 अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करण्याची संधी
(Realme 8 series launched with two smartphones, check price and features)