बंपर ऑफर आणि धमाकेदार फीचर्ससह Realme 8s 5G बाजारात

Realme 8s 5G आज भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. देशात गेल्या आठवड्यात Realme 8i सह हा फोन लाँच करण्यात आला होता.

बंपर ऑफर आणि धमाकेदार फीचर्ससह Realme 8s 5G बाजारात
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 9:24 PM

मुंबई : Realme 8s 5G आज भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. देशात गेल्या आठवड्यात Realme 8i सह हा फोन लाँच करण्यात आला होता. Realme 8s 5G ची विक्री आजपासून सुरु झाली आहे आणि हा फोन फ्लिपकार्ट, Realme.com आणि देशातील प्रमुख ऑफलाइन रिटेलर्स द्वारे विकला होईल. HDFC बँक क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा सुलभ EMI व्यवहार किंवा ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा क्रेडिट EMI वापरून Realme 8s 5G खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 1,500 रुपयांची सूट असेल. (Realme 8s 5G available for sale in India for first time today)

ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड Realme ने आगामी सणासुदीच्या काळात दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्यामध्ये Realme 8i आणि Realme 8s फोनचा समावेश आहे. कंपनीने या फोनद्वारे युजर्सच्या गरजा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही नवीन Realme फोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ट्रिपल रियर कॅमेरासह येतात.

किंमत आणि व्हेरिएंट

Realme 8s 5G दोन स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅम प्लस 128GB स्टोरेज मध्ये येतो, ज्याची किंमत 17,999 रुपये आणि 19,999 रुपयांपर्यंत आहे. Realme 8i ची किंमत 4GB+64GB व्हेरिएंटसाठी 13,999 रुपये आणि 6GB+128GB व्हेरिएंटसाठी 15,999 रुपये आहे.

फीचर्स

रियलमी 8s 5G जगातील पहिल्या MediaTek Dimensity 810 प्रोसेसरवर काम करतो. युनिव्हर्स ब्लू कलर व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन हलका आहे. यात समोरच्या बाजूस पंच-होल सेल्फी सेन्सर असून कॅमेरा बंप आणि मागच्या बाजूला स्लिम बेझल आहे. डिस्प्लेच्या बाबतीत, स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 2400 * 1080 पिक्सेल आहे आणि आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz ते 180Hz आहे.

600 निट्स ब्राइटनेस पीकसह, स्क्रीनवरील कंटेंट प्रखर सूर्यप्रकाशातही पाहता येईल. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 64MP चा प्राथमिक सेन्सर आणि ब्लॅक अँड व्हाईट आणि मॅक्रो फोटोग्राफीसाठी दोन 2MP सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 एमपीचा सेल्फी सेन्सर आहे जो एआय ब्यूटी मोड, पोर्ट्रेट मोड इत्यादींना सपोर्ट करतो.

स्मार्टफोन जगातील पहिल्या MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसरवर काम करतो. हा दोन्ही 5G सिम स्लॉटवर कनेक्टिव्हिटी प्रदान करतो, जेणेकरून वेगवान, अधिक विश्वसनीय कनेक्शन सुनिश्चित होईल. Realme 8s 5G Plus ड्युअल सिम ड्युअल स्टँडबाय आणि SA/NSA ड्युअल नेटवर्किंग मोडला सपोर्ट करतो. हे डिव्हाइस गेमिंगसाठी परफक्ट आहे कारण या सेगमेंटमधील इतर फोनच्या तुलनेत मल्टीटास्किंगच्या बाबतीत हा फोन मागे पडत नाही.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Realme 8s 5G available for sale in India for first time today)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.