6GB/128GB, ट्रिपल रिअर कॅमेरा Realme चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

रियलमीने (Realme) आज भारतात आपला लेटेस्ट Realme 9i हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन Realme फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Realme 8i चा सक्सेसर (उत्तराधिकारी) म्हणून सादर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत Realme 9i दोन विशेष अपडेट्ससह लाँच केला आहे.

6GB/128GB, ट्रिपल रिअर कॅमेरा Realme चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
Realme 9i
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 6:30 AM

मुंबई : रियलमीने (Realme) आज भारतात आपला लेटेस्ट Realme 9i हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन Realme फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Realme 8i चा सक्सेसर (उत्तराधिकारी) म्हणून सादर करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत Realme 9i दोन विशेष अपडेट्ससह लाँच केला आहे. ज्यामध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC आणि 33W फास्ट चार्जिंगचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर (Dual Stereo Speakers) तसेच ट्रिपल रियर कॅमेरा देखील आहे. तथापि, गेल्या वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत डाउनग्रेड म्हणून, Realme 9i मध्ये 90Hz डिस्प्ले आहे, तर Realme 8i हा फोन 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीनसह बाजारात आधीच उपलब्ध आहे.

Realme 9i ची बाजारात Redmi Note 10S आणि Samsung Galaxy M32 शी स्पर्धा होईल. फोनचं हायर व्हेरिएंट Redmi Note 11T 5G ला टक्कर देईल. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS/A-GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे.

Realme 9i ची भारतातील किंमत

भारतात Realme 9i ची किंमत 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी 13,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. फोनचे 6GB + 128GB मॉडेल देखील उपलब्ध आहे ज्याची किंमत 15,999 रुपये आहे. हा फोन प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. Realme 9i हा स्मार्टफोन Flipkart, Realme.com आणि देशातील ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करता येईल. आज (22 जानेवारी) दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनचा सेल लाईव्ह होईल. ग्राहक Flipkart आणि Realme.com वरुन हा फोन खरेदी करु शकतात.

Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स

ड्युअल-सिम (नॅनो) Realme 9i Android 11 सह Realme UI 2.0 वर चालतो आणि 20:1:9 आस्पेक्ट रेशो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच फुल-एचडी+ (1,080×2,412 पिक्सेल) डिस्प्लेसह येतो. याच्या डिस्प्लेमध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट देखील आहे आणि तो ड्रॅगन ट्रेल प्रो ग्लाससह सुसज्ज आहे. यात एक ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC, Adreno 610 GPU आणि 6GB पर्यंत LPDDR4X रॅम आहे. Realme ने सॉफ्टवेअर अपडेटद्वारे Realme 9i वर डायनॅमिक रॅम विस्तार सपोर्ट सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.

फोटो आणि व्हिडिओंसाठी, Realme 9i मध्ये f/1.8 लेन्ससह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सॅमसंग सेन्सरचा समावेश असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअपमध्ये f/2.4 अपर्चर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट शूटर देखील समाविष्ट आहे. Realme 9i मध्ये f/2.1 लेन्ससह 16 मेगापिक्सेलचा Sony IMX471 सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे.

Realme 9i मधील बॅटरी

Realme 9i ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येतो. यात 5,000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी 33W डार्ट चार्जला सपोर्ट करते. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने हा फोन 70 मिनिटांत शून्य ते 100 टक्के चार्ज होतो.

इतर बातम्या

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

(Realme 9i sale live from today onwards, know price and features)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.