8 हजारांच्या रेंजमध्ये ट्रिपल कॅमेरावाला Realme चा नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स
रियलमीने (Realme) आपला बजेट स्मार्टफोन (budget smartphone) रियलमी सी31 (Realme C31) इंडोनेशियामध्ये लॉन्च केला आहे. टेक दिग्गज कंपनी लवकरच हा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.

मुंबई : रियलमीने (Realme) आपला बजेट स्मार्टफोन (budget smartphone) रियलमी सी31 (Realme C31) इंडोनेशियामध्ये लॉन्च केला आहे. टेक दिग्गज कंपनी लवकरच हा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्च डेट शेअर केली आहे. दुसरीकडे, टिपस्टर योगेश ब्रार यांनी स्मार्टफोनच्या भारतीय व्हेरिएंटच्या स्पेसिफिकेशनबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन भारतात 31 मार्च रोजी लॉन्च होईल. इंडोनेशियन लॉन्च इव्हेंटमध्ये स्मार्टफोनचे अधिकृत स्पेसिफिकेशन्स, डिझाइन आणि फीचर्स याआधी समोर आले होते. Realme C31 फोनच्या 3GB RAM + 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $111 (जवळपास 8,463 रुपये) इतकी आहे. हा फोन डार्क ग्रीन आणि लाइट सिल्व्हर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.
Realme C31 मध्ये 6.5 इंचाचा HD + LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz चा टच सॅम्पलिंग रेट आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. यात ऑक्टा-कोर UniSoC T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोन 4GB पर्यंत रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे.
31 मार्चला लाँच होणार Realme C31
Introducing the #realmeC31 in an ultra sleek design, with a mighty battery.#NayeZamaaneKaEntertainment in a whole new form.
Launching at 12:30 PM, 31st March.
Know More: https://t.co/IlAnXnbbsZ pic.twitter.com/O07HLHziBD
— realme (@realmeIndia) March 25, 2022
Realme C31 चा कॅमेरा सेटअप आणि बॅटरी डिटेल्स
फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यापैकी पहिला 13MP प्रायमरी कॅमेरा, एक मॅक्रो लेन्स आणि एक B&W लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C31 मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीने यामधील इंटर्नल स्टोरेज वाढवण्यासाठी टाइप-सी पोर्ट आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिला आहे.
याशिवाय यात 3.5mm हेडफोन जॅक आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI R व्हर्जनवर चालतो. त्याचा आकार 164.7×76.1×8.4 मिमी असा आहे आणि या फोनचे वजन 197 ग्रॅम इतकं आहे. यात डुअल सिम, 4 जी, वायफाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, आणि गॅलिलिओ सारखे फीचर्स देखील आहेत.
realme C31
•6.5″ HD+ LCD •UNISOC T612 SoC •3/4GB RAM, 32/64GB storage •Rear Cam- 13MP + 2MP (Macro) + 2MP (BW) •Front Cam- 5MP •Android 11, Realme UI R edition •5,000mAh battery, 10W charging
3.5mm Jack, Side-mounted fingerprint
*India launch – 31st March*
— Yogesh Brar (@heyitsyogesh) March 24, 2022
यासोबतच, Realme GT 2 Pro स्मार्टफोन 7 एप्रिलला भारतात दाखल होईल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट आणि 5000 mAh बॅटरीसह अनेक चांगले फीचर्स आहेत.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स