Realme C33 : 50MP कॅमेऱ्यासह आणखी कोणते फीचर्स? रियलमीच्या बजेट स्मार्टफोन C33ची विक्री सुरू

ज्या ग्राहकांना 10 हजारांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन फोन घ्यायचा असेल, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या रियलमी फोनची विक्री आजपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर सुरू होत आहे.

Realme C33 : 50MP कॅमेऱ्यासह आणखी कोणते फीचर्स? रियलमीच्या बजेट स्मार्टफोन C33ची विक्री सुरू
रियलमी स्मार्टफोन्सImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 2:32 PM

गेल्या काही दिवसांपासून रियलमीच्या मोबाइल्सचे मार्केट शेअर वाढताना दिसत आहे. कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स (Features) अन्‌ विविध डिस्काउंटचा लाभ घेता येत असल्याने ग्राहक रियलमीच्या फोनकडे आकर्षित होत आहेत. जर तुम्हालाही 10 हजारांपर्यंतच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल तर काही दिवसांपूर्वी रियलमीने (Realme) आपला नवीन स्मार्टफोन रियलमी सी 33 (Realme C33) हा लॉन्च केला होता. आजपासून हा बजेट स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट (Flipkart) त्याच सोबत कंपनीच्या अधिकृत साइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या बजेट फोनमध्ये कंपनीने 120 हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेट दिला आहे, तसेच 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. कमी किंमतीत कॅमेरा अधिक चांगल्या दर्जाचा असल्याने ग्राहक याला कसा प्रतिसाद देतात, ते पाहावे लागणार आहे.

Realme C33ची किंमत?

रियलमी मोबाइल फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8999 रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे आणि तुम्ही हे मॉडेल 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. फोनची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत साइटवर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे. ग्राहक हा फोन नाइट सी, एक्वा ब्लू आणि सँडी गोल्ड कलर्समध्ये खरेदी करू शकतील.

डिस्प्ले : या बजेट फोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले असून तो 400 nits पीक ब्राइटनेस आणि 120 Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. प्रोसेसर : या रियलमी फोनमध्ये Unisock T612 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

रॅम : रियलमी C33 3 जीबी आणि 4 जीबी रॅम अशा दोन पर्यायांसह लॉन्च करण्यात आला आहे.

कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेल AI कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी : या बजेट फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली असून त्यामुळे हा कमी बजेटमध्ये हा फोन अधिक दमदार झाला आहे. सॉफ्टवेअर : हा नवीन फोन Android 12 आउट ऑफ द बॉक्ससह लॉन्च करण्यात आला आहे.

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.