Realme GT 2 Pro 9 4G आज होणार भारतीय बाजारात दाखल , 108MP कॅमेऱ्यासह जाणून घ्या खास गोष्टी

Realme भारतीय बाजारपेठेत पुन्हा दिमाखदारपणे त्यांच्या नवीन उत्पादनासह उतरत आहे. . या इव्हेंटमध्ये (Event) कंपनी आपला प्रीमियम स्मार्टफोन (Realme GT 2 Pro) लाँच करणार आहे. यासोबतच (Realme 9 4G) एडिशन देखील भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात येणार आहे

Realme GT 2 Pro 9 4G आज होणार भारतीय बाजारात दाखल , 108MP कॅमेऱ्यासह जाणून घ्या खास गोष्टी
Realme GT 2 Pro 9 4G आज होणार भारतीय बाजारात दाखलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 11:07 AM

Realme भारतीय बाजारपेठेत पुन्हा दिमाखदारपणे त्यांच्या नवीन उत्पादनासह उतरत आहे. . या इव्हेंटमध्ये (Event) कंपनी आपला प्रीमियम स्मार्टफोन (Realme GT 2 Pro) लाँच करणार आहे. यासोबतच (Realme 9 4G) एडिशन देखील भारतीय बाजारपेठेत दाखल करण्यात येणार आहे, हा स्मार्टफोन (108MP) कॅमेरा सोबत येणार आहे.ब्रँडच्या 9-सीरीजचा हा 6 वा आणि दुसरा 4 जी फोन असणार आहे. यात (Qualcomm Snapdragon 680) प्रोसेसर असेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.अहवालानुसार, या दोन हँडसेट व्यतिरिक्त हा ब्रँड इतरही अनेक उत्तमोत्तम उत्पादने घेऊन येत आहे. आज 7 एप्रिलच्या इव्हेंटमध्ये कंपनी दोन्ही स्मार्टफोनसोबत Realme Buds Air 3 आणि Realme Smart TV Stick लाँच करणार आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोन विषयी

अवघ्या दोन तासात फोनचे लॉन्चिंग

रियलमीचा हा इव्हेंट आज 7 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. म्हणजे अवघ्या दोन तासानंतर तुम्ही या स्मार्टफोनला बूक करु शकतात. या कार्यक्रमाचे प्रसारण कंपनी आपल्या यूट्यूब चॅनेल आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करणार आहे. कंपनीने यापूर्वीच Realme GT 2 Pro जागतिक बाजारात लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनी Realme 94G ला 108MP कॅमेरासोबत लाँच करणार आहे.

Realme GT 2 Proचे वैशिष्ट्य

हा हँडसेट चीन आणि जागतिक बाजारात यापूर्वीच लाँच करण्यात आला असल्याने भारतीय मोबाईल प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. रियलमीचा हा फोन 6.7-inchचा 2K AMOLED स्क्रीन सोबत 120Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करेल आणि त्यात 12GB पर्यंतच्या रॅमचा पर्याय उपलब्ध आहे.

हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय 50MPचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मायक्रोस्कोप कॅमेरा मिळेल.

फ्रंटमध्ये कंपनी 32MP सेल्फी कॅमेरा देणार आहे. डिव्हाइसमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अहवालानुसार, कंपनी या फोनला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त बजेटमध्ये लाँच करू शकते.

Realme 94G फीचर्स ब्रँडच्या 9-सीरीजचा हा 6 वा आणि दुसरा 4 जी फोन असणार आहे. यात Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर असेल, जो 8GB RAM आणि 128GB स्टोरेज पर्यायांसह येतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह AMOLED स्क्रीन मिळेल. हँडसेटमध्ये 108MPच्या मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

Nashik Public Healthcare: नाशिक जिल्हा रुग्णालयात 3 महिला बोगस डॉक्टर आढळल्याने खळबळ

Rape on Animal | घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात

‘Raj Thackeray यांनी पुन्हा आपली भूमिका बदलू नये, मोरे आणि बाबर यांच्या पेक्षा हिंदुत्व महत्त्वाचं’- आनंद दवे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.