12GB/512GB, Narzo 50 सह Realme GT 2 सिरीज भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या दोन्ही फोनमध्ये काय असेल खास?

रियलमी जीटी 2 (Realme GT 2) सीरीजमधील लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि रियलमी नार्झो 50 (Realme Narzo 50) लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. Realme GT 2 सिरीजमध्ये Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असेल जे गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाले होते.

12GB/512GB, Narzo 50 सह Realme GT 2 सिरीज भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या दोन्ही फोनमध्ये काय असेल खास?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 5:56 PM

मुंबई : रियलमीचे (Realme) उपाध्यक्ष माधव सेठ यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आस्क मी एनिथिंग (Ask Me Anything)’ सत्र घेतले होते. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की रियलमी जीटी 2 (Realme GT 2) सीरीजमधील लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि रियलमी नार्झो 50 (Realme Narzo 50) लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. Realme GT 2 सिरीजमध्ये Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असेल जे गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाले होते. दोन्ही फोनच्या अधिकृत लॉन्च डेटबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी, कंपनीने नोव्हेंबरमध्ये Realme Narzo 50i आणि Narzo 50A भारतात सादर केले होते. भारतात Realme GT2 सिरीज लाँच करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सेठ म्हणाले, “Realme GT2 सिरीज आमच्या सर्वात लोकप्रिय डिव्हाईसेसपैकी एक आहे. ही सिरीज लवकरच भारतात सादर केली जाईल.

Realme GT 2 चे भारतीय व्हर्जन गेल्या महिन्यात Google Play Console वर पाहायला मिळाले होते. काही आठवड्यांपूर्वी, Realme GT 2 Pro ला भारतीय मानक ब्युरोकडून (BIS) प्रमाणपत्र देखील मिळाले होते. Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro दोन्ही चीनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे आणि स्नॅपड्रॅगन SoCs सह लॉन्च करण्यात आले होते. Realme GT 2 सिरीज लॉन्च करण्यासोबतच सेठ यांनी भारतात Realme Narzo 50 लाँच करण्याचे संकेतही दिले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, Realme Narzo 50 Pro भारतात लाँच होईल अशी अफवा पसरली होती. मात्र, त्यावेळी कंपनीने अशी कोणतीही घोषणा केली नव्हती.

Realme GT 2 सीरीज चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 सिरीज गेल्या महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, याच्या व्हॅनिला Realme GT 2 व्हेरिएंटमध्ये 6.62 इंचांचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन स्नॅपड्रॅगन 888 सह सुसज्ज आहे. हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. यात दोन 50MP सेन्सर देखील समाविष्ट आहे, जो मुख्य सेन्सर आहे. आणि दुसरी 150 डिग्री अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. याशिवाय, तिसरी 40X मॅक्रो-लेन्स सेन्सर आहे जी सेटअप पूर्ण करते.

Realme GT 2 Pro चे स्पेक्स

Realme GT 2 Pro मध्ये 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह 6.7-इंचांचा 2K Samsung E4 AMOLED LTPO 2.0 डिस्प्ले पॅनेल आहे. हा डिस्प्ले गोरिला ग्लास व्हिक्टससह येतो आणि 1000Hz टच सॅम्पलिंगसह सुसज्ज आहे. प्रो व्हेरियंट नवीन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 सह सुसज्ज आहे आणि 12GB RAM आणि 512GB स्टोरेजसह येतो. यात GT 2 सारखा कॅमेरा सेटअप समाविष्ट आहे. यात NFC, स्टिरीओ स्पीकर आणि Android 12 आधारित Realme UI 3.0 समाविष्ट आहे.

इतर बातम्या

सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.