Realme GT Neo 2 भारतात लाँच, गेमर्ससाठी विशेष फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Realme GT NEO 2 अखेर भारतात लाँच झाला आहे. यामध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे.
मुंबई : बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Realme GT NEO 2 अखेर भारतात लाँच झाला आहे. Realme GTNEO2 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. Realme GTNEO2 हा डायमंड थर्मल-जेल वापरण्यात आलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यात 20% डायमंड डस्ट असते, कारण हिरा हा इतर मटेरियलपेक्षा उत्तम थर्मल कंडक्टिव्ह मटेरियल आहे, ज्यामुळे 50% अधिक हीट ट्रान्सफर होते. या विशिष्ट्यामुळे हा फोन गेमिंगसाठी उत्तम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. (Realme GT Neo 2 launched in india with Snapdragon 870 SoC, 120Hz AMOLED Display, know Price, Specifications)
Realme GT NEO 2 स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह 4 Kryo 585 CPU द्वारे समर्थित आहे, जे 3.2Ghz वर परफॉर्म करते. फोटोग्राफीसाठी यामध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रत्येक क्षण कॅप्चर करण्यासाठी, डिव्हाइसमध्ये 64 एमपी मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सज्ज आहे.
रियलमी जीटी नियो 2 चे स्पेसिफिकेशन्स
Realme GT Neo 2 मध्ये 6.62-इंच सुपर AMOLED डिस्प्ले 120hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 92.6 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 600 हर्ट्ज सॅम्पलिंग रेट, HDR10+ देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यात 7GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील समाविष्ट आहे.
Realme GT Neo 2 ची किंमत आणि उपलब्धता
Realme GT Neo दोन व्हेरिएंटमध्ये येतो याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन 17 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि ऑफलाइन स्टोअर्सवर देशभर उपलब्ध होईल.
The #realmGTNEO2 features one of the most compelling Camera setups for everyday power users and street photographers.
There are three rear camera lenses including a 64MP main camera to make sure you’re capable of capturing every moment.#EverythingInNEOhttps://t.co/YF67KslkGW pic.twitter.com/NsBmvkeDYk
— realme (@realmeIndia) October 13, 2021
इतर बातम्या
बहुप्रतिक्षित OnePlus 9RT ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर
‘या’ स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा मिळणार, 2021 मध्ये हे टॉप कॅमेरा फोन घरी आणा
(Realme GT Neo 2 launched in india with Snapdragon 870 SoC, 120Hz AMOLED Display, know Price, Specifications)