Realme चं Apple च्या पावलावर पाऊल, नवा स्मार्टफोन भारतात चार्जरशिवाय विकणार, जाणून घ्या कसा आहे नवीन फोन?

स्मार्टफोन निर्माता रियलमी (Realme) लवकरच भारतात नवीन फोन रियलमी नार्झो 50ए प्राईम (Realme Narzo 50A Prime) सादर करणार आहे. हा कंपनीचा पहिला फोन असेल जो चार्जरशिवाय बाजारात दाखल झाला आहे.

Realme चं Apple च्या पावलावर पाऊल, नवा स्मार्टफोन भारतात चार्जरशिवाय विकणार, जाणून घ्या कसा आहे नवीन फोन?
Realme Narzo 50A Prime Image Credit source: Realme
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 2:27 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता रियलमी (Realme) लवकरच भारतात नवीन फोन रियलमी नार्झो 50ए प्राईम (Realme Narzo 50A Prime) सादर करणार आहे. हा कंपनीचा पहिला फोन असेल जो चार्जरशिवाय बाजारात दाखल झाला आहे. अॅपलने चार्जरशिवाय फोन पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर सॅमसंग (Samsung) आणि आता रियलमी ही चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनीदेखील त्याच मार्गावर आहे. कंपनीने अलीकडेच घोषणा केली आहे की आगामी स्मार्टफोन Realme Norzo 50A चार्जरशिवाय येईल. Realme Norzo 50A Prime गेल्या महिन्यात इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि हा फोन तिथेदेखील वॉल चार्जरशिवाय पाठवण्यात आला होता. Narzo 50A प्राइम चार्जिंग ब्रिकशिवाय शिप करण्यात आलेला पहिला Realme स्मार्टफोन असेल, कंपनीने म्हटले आहे की इतर Realme आणि Narzo प्रोडक्ट्स चार्जरसह विकले जातील.

कंपनीने त्यांच्या कम्युनिटी फोरमवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार Realme ने म्हटले आहे की Realme Narzo 50A Prime चं भारतीय व्हर्जन बॉक्समध्ये वॉल चार्जरशिवाय डिलीव्हर केलं जाईल. कंपनीचे याबाबत म्हणणे आहे की Realme Narzo 50A Prime च्या बॉक्समधून चार्जिंग ब्रिक काढून टाकल्याने कंपनीला अनेक प्रकारे मदत झाली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की ते डिव्हाइस सर्वोत्तम किंमतीसह, अपग्रेडसह सादर केलं जाईल.

Realme Narzo 50A Prime चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात इंडोनेशियामध्ये Android 11-आधारित Realme UI R व्हर्जनसह लॉन्च करण्यात आला होता. Realme Narzo 50A प्राइम भारतात येत्या आठवड्यात लॉन्च होईल. हा फोन 6.6-इंचाच्या फुल-एचडी+ डिस्प्लेसह येतो आणि Unisoc T612 चिपसेटसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये 4GB RAM आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे, याची स्टोरेज स्पेस microSD कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च केला जाईल.

फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, Realme Narzo 50A प्राइम ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी शूटर, एक मोनोक्रोम पोर्ट्रेट सेन्सर आणि मॅक्रो लेन्स समाविष्ट असेल. Realme Narzo 50A Prime मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा शूटर असेल.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.