256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर
Realme कंपनी सातत्याने नवनवे फिचर्स असलेले किफायतशीर स्मार्टफोन्स भारतात लाँच करत आहे. कंपनीने आता भारतात X7 सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे.
मुंबई : Realme ही चिनी स्मार्टफोन कंपनी गेल्या वर्षभरापासून देशातील अनेक मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. कंपनी सातत्याने नवनवे फिचर्स असलेले किफायतशीर स्मार्टफोन्स भारतात लाँच करत आहे. कंपनीने आता भारतात X7 सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी या वृत्ताची पुष्टी केली आहे. (Realme X7 series with 5G Connectivity and 256GB storage confirmed for Launch in India)
X7 सिरीज कधी लाँच होणार याबाबतची कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केली नसली तरी हा फोन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन असणार आहेत. X7 आणि X7 प्रो अशी या स्मार्टफोनची नावं असतील.
हे दोन्ही फोन चीनमध्ये 5G सेगमेंटमध्ये यापूर्वीच लाँच करण्यात आले आहेत. सेठ यांनी नुकतेच याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रियलमी कंपनी 2021 मध्ये 5G तंत्रज्ञानासह मार्केटमध्ये उतरणार आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, X7 सिरीजमध्ये कदाचित तीन व्हेरिएंटचा समावेश केला जाईल.
रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल.
कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल्सचा सोनीचा IMX686 प्रायमरी सेन्सर दिला जाणार आहे. तसेच 8 मेगापिक्सेलचा अजून एक सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) दिला जाईल. तसेच फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे.
Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर
बजेट आणि मिड सेगमेंटमध्ये (किफायतशीर आणि मध्यम किंमतीतले फोन) लीड केल्यानंतर शाओमी (Xiaomi) लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone) लाँच करु शकते. शाओमीने यापूर्वी MI Mix Alpha या स्मार्टफोनचा खुलासा केला होता. हा फोन फ्लेक्सिबल OLED डिस्लेप्रमाणे होता. परंतु कंपनीने हा फोन लाँच केला नाही. आता कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
XDA च्या रिपोर्टनुसार शाओमी कंपनी सध्या फोल्डेबल डिव्हाईसवर काम करत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या डिव्हाईसचं नाव ‘Cetus’ असू शकतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, नवीन फोल्डेबल स्मार्टफोन MIUI च्या अँड्रायड 11 वर काम करेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या फोनचा कॅमेरा, या फोनमध्ये तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगॅन 800 सिरीजचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो हाय एंड स्पेक्समध्ये गणला जातो. या फोन खूप महाग असणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच फोल्डेबल फोनबाबत माहिती दिलेली नाही. यापूर्वीदेखील कंपनीने फोल्डेबल फोनचं डिझाईन लिक केलं होतं.
संबंधित बातम्या
Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
5G सपोर्टसह Oppo K7x स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट
(Realme X7 series with 5G Connectivity and 256GB storage confirmed for Launch in India)