Redmi : रेडमी 10 पॉवर भारतात लाँच, किमतीसह ‘ही’ आहेत खास स्पेसिफिकेशन्स
आज (20 एप्रिल) रेडमीने भारतात त्यांचे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत, यात एक रेडमी 10A आणि दुसरा रेडमी 10 पॉवरचा समावेश आहे. हे नवीन फोन रेडमी 9 पॉवरचे अपग्रेड केलेल्या सिरीजमधील स्मार्टफोन आहेत.
मुंबई : रेडमीने भारतात लाँच केलेल्या रेडमी 10A आणि रेडमी 10 पॉवर (Redmi 10 power) हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आलेल्या रेडमीच्या 9 पॉवरचे अपग्रेड सिरीजमधील स्मार्टफोन (Smartphone) आहेत. रेडमी 10 पॉवरमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 8 GB रॅम आहे. डिसप्लेवर गोरिल्ला ग्लासचे 3 प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. रेडमी 10 पॉवरसह 8 GB पर्यंत रॅमदेखील देण्यात आली आहे. रेडमी 10 पॉवरच्या 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन पॉवर ब्लॅक आणि स्पोर्टी ऑरेंज कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, कंपनीने फोनच्या विक्रीच्या (Sale) तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
अशी आहे रचना
रेडमी 10 पॉवरमध्ये अँड्रोइड 11 वर आधारित MIUI 13 आहे. यात 6.7 इंचाचा HD+ IPS LCD डिसप्ले देण्यात आला असून त्याची ब्राइटनेस 400 निट्सपर्यंत आहे. डिसप्लेसोबत गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण उपलब्ध असेल. यात ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU सह स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 8 GB LPDDR4x रॅम 3 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम म्हणजेच एकूण 11 GB रॅम देण्यात आली आहे.
5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, या रेडमी फोनमध्ये दोन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेंस 50 मेगापिक्सेल आहे, अपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेंस f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलची आहे. यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
रेडमी 10 पॉवर बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 10 पॉवरमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5, GPS/ A-GPS, USB Type-C, 3.5mm हेडफोन जॅक आणि पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. बॉक्समध्ये फक्त 10W चा चार्जर उपलब्ध असले तरी रेडमी 10 पॉवर 18W जलद चार्जिंगसह 6000mAh बॅटरी पॅक करते.
इतर बातम्या :