Xiaomi 6000mAh बॅटरीसह सर्वात हलका स्मार्टफोन लाँच करणार, किंमत…
Xiaomi कंपनी शुक्रवारी (3 सप्टेंबर) दुपारी ऑनलाईन लॉन्च इव्हेंट दरम्यान भारतात रेडमी 10 प्राइम (Redmi 10 Prime) हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
मुंबई : Xiaomi कंपनी शुक्रवारी दुपारी ऑनलाईन लॉन्च इव्हेंट दरम्यान भारतात रेडमी 10 प्राइम (Redmi 10 Prime) हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. जिथे कंपनी रेडमी ब्रँडिंगसह नवीन TWS देखील सादर करेल. Redmi 10 Prime ला जागतिक स्तरावर Redmi 10 म्हणून लाँच करण्यात आले होते. हा स्मार्टफोन MediaTek Helio G88 SoC आणि 90Hz IPS LCD सह येतो. Redmi 10 Prime हा कंपनीचा परवडणारा स्मार्टफोन असेल आणि त्याचबरोबर हा फोन खूप हलका असेल. (Redmi 10 Prime to come with Pack 6,000mAh Battery, Support Reverse Charging)
Xiaomi ने फोनच्या भारतीय व्हेरिएंटमधील काही फीचर्स उघड केले आहेत आणि असा दावा केला आहे की, हा 6000mAh बॅटरीसह सर्वात हलका स्मार्टफोन असेल. Xiaomi इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी हा दावा केला आहे.
मनू यांनी ट्वीट केले आहे की, रेडमी 10 प्राइम 5000 एमएएच बॅटरी ऐवजी 6000 एमएएच चा मोठा बॅटरी पॅक ऑफर करेल, जो रेडमी 10 च्या ग्लोबल व्हेरिएंटला पॉवर देतो. Redmi 10 हा 18W फास्ट चार्जिंग आणि 9W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येतो. ही वैशिष्ट्ये या फोनच्या भारतीय व्हेरिएंटमध्येदेखील उपलब्ध असावीत, असा अंदाज आहे. ग्लोबल व्हेरिएंटचे वजन 181 ग्रॅम आहे आणि जाडी 8.9 मिमी आहे. भारतीय व्हेरियंटचे वजन किती ग्रॅम आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
फीचर्स आणि स्पेक्स
Redmi 10 Prime मध्ये MediaTek Helio G88 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे. अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसह फोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी + एलसीडी आहे. डिस्प्ले 45, 60 आणि 90Hz दरम्यान स्विच होतो. त्याच्या ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टीममध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि डेप्थ आणि मॅक्रोसाठी दोन 2 मेगापिक्सेल सेन्सर समाविष्ट आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत
डिव्हाइस साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, ड्युअल स्पीकर्स आणि 3.5mm हेडफोन जॅकसह येते. हे डिव्हाइस अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12.5 चालते. जागतिक स्तरावर, फोनचे 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट $ 179 (13,300 रुपये) या किंमतीसह लाँच करण्यात आले आहे. सोबतच हा फोन तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये देखील येते, ज्याची किंमत 199 डॉलर (अंदाजे 14,800 रुपये) इतकी आहे.
इतर बातम्या
आयफोनप्रेमींसाठी वाईट बातमी, Apple iPhone 13 मधलं ‘महत्त्वाचं’ फीचर भारतात चालणार नाही
रिलायन्स जिओ Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन्स बदलणार, जाणून घ्या कसे असतील नवे प्लॅन्स
(Redmi 10 Prime to come with Pack 6,000mAh Battery, Support Reverse Charging)