512GB स्टोरेजसह दमदार फीचर्स, Redmi चा नवा गेमिंग लॅपटॉप G 2021 लाँच, किंमत…

शाओमीने (Xiaomi) आपल्या रेडमी जी गेमिंग लॅपटॉपचा सक्सेसर लाँच केला आहे, जो गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता. Redmi G 2021 नावाने हा लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे.

512GB स्टोरेजसह दमदार फीचर्स, Redmi चा नवा गेमिंग लॅपटॉप G 2021 लाँच, किंमत...
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 4:48 PM

मुंबई : शाओमीने (Xiaomi) आपल्या रेडमी जी गेमिंग लॅपटॉपचा सक्सेसर लाँच केला आहे, जो गेल्या वर्षी सादर करण्यात आला होता. Redmi G 2021 नावाने हा लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे. नवीन मॉडेल मागील मॉडेलच्या तुलनेत काही अपग्रेडसह येते, जे चांगल्या परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करते. हा लॅपटॉप आता अपग्रेड केलेल्या इंटेल कोर प्रोसेसर ऑप्शन आणि AMD वेरिएंट्ससह येतो. (Redmi G 2021 gaming laptops launched with 16.1, 144Hz displays, Intel and AMD processors, Nvidia RTX graphics, know more)

नवीन Redmi G देखील पूर्वीसारखाच दिसतो. रियर पॅनलवरील डिझाईन नवीन दिसते पण समोरचा भाग कीबोर्ड आणि मोठ्या सेंट्रल ट्रॅकपॅडसारखा दिसतो. यात सेम 16.1-इंच डिस्प्ले आहे जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि तळाशी जाड बेझल्ससह आहे. Redmi G 2021 वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्समध्ये येतो.

किंमती

Redmi G 2021 11 जनरेशन Intel Core i5 प्रोसेसरसह CNY 5,699 (जवळपास 64,900 रुपये) पासून किरकोळ विक्री सुरू करेल. गेल्या वर्षीच्या Redmi G मध्ये दिसलेल्या 10 व्या जनरेशनचा Intel Core i5 प्रोसेसर यात अपग्रेड करण्यात आला आहे. AMD Ryzen 7 व्हेरिएंटची किंमत CNY 6,999 (जवळपास 79,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. सध्या हे गेमिंग लॅपटॉप फक्त चीनमध्ये उपलब्ध असतील. एएमडी व्हेरिएंटची 28 सप्टेंबरपासून किरकोळ विक्रीस सुरू होईल. शाओमीने अद्याप जागतिक बाजारपेठेसाठी आपल्या योजना जाहीर केल्या नाहीत.

फीचर्स

नवीन Redmi G गेमिंग लॅपटॉप 16.1-इंच डिस्प्लेसह येतो ज्यात 144Hz रिफ्रेश रेट मिळेल. हा 11 जनरेशन इंटेल कोर i5 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे जो Nvidia GeForce RTX 3050 ग्राफिक्स कार्डसह जोडलेला आहे. जो 2020 मॉडेलवर अपग्रेड केला आहे. AMD ऑप्शन AMD Ryzen 7 प्रोसेसर आणि Nvidia GeForce RTX 3060 ग्राफिक्ससह येतो.

इंटेल आणि एएमडी दोन्ही पर्याय 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतात. लॅपटॉप विंडोज 10 वर चालतो, हा लॅपटॉप विंडोज 11 मध्ये अपग्रेड करता येईल, मात्र त्यासाठी लाँचिंगची वाट पाहावी लागेल. शाओमीने गेमिंग लॅपटॉपवर Hurricane Cooling 3.0 कूलिंग सिस्टमचा वापर केला आहे जो गेमिंगदरम्यान, लॅपटॉप जास्त गरम होऊ देत नाही. यात मोठे ड्युअल फॅन्स आणि चार आउटलेटचा वापर करण्यात आला आहे.

लॅपटॉपवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 6, थंडरबोल्ट 4 आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी समाविष्ट आहे. रेडमी जी 2021 थ्री लेव्हल बॅकलिट कीबोर्ड, DTS:X अल्ट्रा 3 डी सराउंड साउंड आणि जिओ एआय डिजिटल असिस्टंटसह देखील येतो. AMD व्हेरिएंट 230W पॉवर अॅडॉप्टरसह रीटेल करतो, तर इंटेल पर्यायाला 180W अॅडॉप्टर मिळतो.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Redmi G 2021 gaming laptops launched with 16.1, 144Hz displays, Intel and AMD processors, Nvidia RTX graphics, know more)

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.