पोको फोनच्या नावाने लॉन्च होणार रेडमी के 40 ; स्मार्टफोनमध्ये मिळणार 5 जी सपोर्ट

पोको फोनच्या नावाने लॉन्च होणार रेडमी के 40 ; स्मार्टफोनमध्ये मिळणार 5 जी सपोर्ट (Redmi K40 smartphone to be launched in India with 5G support)

पोको फोनच्या नावाने लॉन्च होणार रेडमी के 40 ; स्मार्टफोनमध्ये मिळणार 5 जी सपोर्ट
पोको फोनच्या नावाने लॉन्च होणार रेडमी के 40
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 8:41 PM

नवी दिल्ली : शाओमी कंपनीने चीनमध्ये 25 फेब्रुवारीला रेडमी के40 ची सिरीज लॉन्च केली आहे. हा रेडमी के 40 भारतात पोको फोनच्या रुपात लॉन्च केला जाणार आहे. कंपनीने रेडमी के40 सिरीज अंतर्गत तीन फोन लॉन्च केले आहेत. यात रेडमी के40, रेडमी के4 0 प्रो आणि रेडमी के40 प्रो प्लसचा समावेश आहे. कंपनी रेडमी के40 हा फोन भारतासह संपूर्ण जगभरात पोको फोनच्या रुपात लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. अलिकडेच या डिव्हाईसचे मॉडेल नंबर पोको ब्रॅण्डिंगसोबत दाखवण्यात आले होते. Redmi K40 smartphone to be launched in India with 5G support)

ईन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट ऑथरीटीने 91 मोबाईल्सवर स्पॉट केलेल्या लिस्टींगनुसार, मॉडेल नंबर M2012K11AG असलेल्या फोनला पोको फोनच्या रुपात लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. हा मॉडेल नंबर रेडमी के 40 शी संबंधित आहे. प्राप्त वृत्तानुसार, चीनबाहेर स्मार्टफोनला रेडमी के 40 च्या रुपात नाही तर एक पोको फोन म्हणून लाॉन्च केले जाऊ शकते. झाओमी कंपनीने अजून रेडमी के 40 चे जागतिक पातळीवर या फोनचे लॉन्चिंग कधी करणार, याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही. याबरोबरच M2012K11G असलेला फोन 5जी सपोर्टसोबत मार्केटमध्ये दाखल होणार आहे. ही पहिली वेळ नाही. कंपनीने आपल्या फोनचे रिब्रॅण्ड केले आहे. लोकप्रिय ‘पोको एम 2 प्रो’सुद्धा ‘रेडमी नाऊ 9प्रो’चा रिब्रॅण्ड आहे.

रेडमी के 40 ची वैशिष्ट्ये

रेडमी के40मध्ये अनेक खास गोष्टी आहेत. यात 1080×2-400 पिक्सल रिझोल्युशनबरोबर 6.67 इंच फूल एचडी प्लस फिचर आहे. हा फिचर 120Hz च्या रिफ्रेश रेटमध्येही मिळतो. स्मार्टफोन एक ओक्टा कोर क्वालकाॅम स्नॅपड्रॅगन 870 SoC द्वारा संचालित आहे. यात 12GB आणि 256GB स्टोरेज आहे. तसेच एक क्वाड कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, एक अल्ट्रा-वाईड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेंसरचा समावेश आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. कनेक्टिव्हीटीसाठी रेडमी K40 मध्ये 5G, 4G LTE, वायफाय 6, ब्लूटूथ v5.1, GPS/A-GPS, NFC, इन्फ्रारेड (IR) आणि एक USB टाईप C पोर्टसाठी सपोर्ट अशी हटके फिचर्स आहेत. स्मार्टफोनमध्ये 4,520 mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टसह दिली जाते.

जाणून घ्या रेडमी के 40 ची किंमत?

रेडमी के40चे 6GB +128 GB माॅडेल ( किंमत जवळपास 22,400 रुपये) चीनमध्ये लाॅन्च करण्यात आले होते. 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी स्मार्टफोनची किंमत जवळपास 24,700 रुपये इतकी आहे. तसेच 8GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत 28,000 रुपयांच्या आसपास आहे. माॅडेलच्या 12GB +256GB व्हर्जनची किंमत 30 हजारांच्या आसपास आहे. Redmi K40 smartphone to be launched in India with 5G support)

इतर बातम्या

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना

मारुती सुझुकीचा विक्रम; 35 वर्षांत 100 देशांत 20 लाख कारची विक्री

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.