Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री

Xiaomi कंपनीने गुरुवारी घोषणा केली आहे की, त्यांनी रेडमी नोट 10 सिरीजच्या (Redmi Note 10 Series) 20 लाख युनिट्स स्मार्टफोनची विक्री केली आहे,

Xiaomi च्या 'या' स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री
Redmi Note 10
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 10:44 PM

मुंबई : Xiaomi कंपनीने गुरुवारी घोषणा केली आहे की, त्यांनी रेडमी नोट 10 सिरीजच्या (Redmi Note 10 Series) 20 लाख युनिट्स स्मार्टफोनची विक्री केली आहे, ज्याची किंमत 3000 कोटींपेक्षा जास्त आहे. रेडमी नोट 10 सिरीज लाँच झाल्यापासून कंपनीने सर्व प्लॅटफॉर्मवर ही विक्री साधली आहे. यावर्षी मार्चमध्ये लाँच केलेल्या Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10 Pro. Redmi Note 10S आणि Redmi Note 10 या स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा फोन कमी किंमतीत ग्राहकांना प्रीमियम अनुभव प्रदान करतो, असे कंपनीने म्हटले आहे. (Redmi Note 10 Series Smartphones record sale of 20 lakhs units in 3 months)

रेडमी नोट 10 हा स्मार्टफोन ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 वर चालतो आणि 6.43 इंच फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा पीक ब्राइटनेस 1100 nits पर्यंत आहे. या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. याची बॅटरी 5000 एमएएच असून 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग देखील सपोर्टेड आहे. तसेच, त्यात एक झेड-अॅक्सिस वायब्रेशन मोटर आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी पर्यंतचा LPDDR4x रॅम आणि Adreno 612 GPU सह ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी 48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi अंडर डिस्प्ले कॅमेरासह स्मार्टफोन लाँच करणार

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, स्मार्टफोन ब्रँड शाओमी (Xiaomi) Mi 11 Ultra सारख्याच क्षमतेचा फ्लॅगशिप फोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये अल्ट्रा-वाइड बँड (UWB) ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि एक अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असू शकेल. जीएसएमअरेनाच्या अहवालानुसार, UWB आधीच Apple आणि सॅमसंगच्या लेटेस्ट फ्लॅगशिप डिव्हाईसेसमध्ये फीचर केला आहे.

सॅमसंग स्मार्टटॅग आणि Apple एअरटॅग हे तंत्रज्ञान अचूक ट्रॅकिंगसाठी अनुक्रमे गॅलेक्सी एस 21 आणि आयफोन 12 मध्ये देण्यात आलं आहे. अहवालात असे म्हटले आहे की, शाओमी कदाचित UWB -अनुकूल, ट्रॅक करण्यायोग्य अॅक्सेसरीज सादर करण्याची योजना आखत आहे.

अहवालानुसार, अलीकडील इम्प्लिमेन्टेशनमध्ये, अंडर-डिस्प्ले कॅमेरा अद्याप परफेक्ट मानला जात नाही, कारण डिस्प्ले अद्याप पारदर्शक नसल्याने या कॅमेऱ्याच्या क्षमतेबाबत संभ्रम आहे. तथापि, Google कडील अलिकडील पेटंट स्विचिंग प्रिज्म्स वापरुन हा अडथळा दूर करता येईल. शाओमीच्या फ्लॅगशिपमध्ये Mi 11 Ultra सारखाच प्रभावी कॅमेरा सेटअप असणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये 70W फास्ट-वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 120W वायर्ड फास्ट-चार्जिंग देखील दिले जाऊ शकते. फोन अरेनाच्या वृत्तानुसार, हे फ्लॅगशिप डिव्हाइस Mi 11 Ultra पेक्षा अधिक दमदार नसेल. परंतु ते Mi 10T सिरीजप्रमाणे असेल.

इतर बातम्या

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

(Redmi Note 10 Series Smartphones record sale of 20 lakhs units in 3 months)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.