Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

Redmi Note 10S भारतात मे महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने आता या फोनचं 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात लॉन्च केलं आहे. कंपनीने या फोनचे दोन व्हेरिएंट या वर्षीच्या मे महिन्यात लाँच केले होते.

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत...
Redmi Note 10S
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 3:33 PM

Redmi Note 10S Launched in India : Redmi Note 10S भारतात मे महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने आता या फोनचं 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात लॉन्च केलं आहे. कंपनीने या फोनचे दोन व्हेरिएंट या वर्षीच्या मे महिन्यात लाँच केले होते, ज्यामध्ये 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत. हा फोन MediaTek Helio G95 SoC सह सुसज्ज आहे. तसेच यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 6.43 इंचाचा फुल-एचडी + (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. (Redmi Note 10S new 8GB RAM 128GB storage Variant launched in India at price of 17499 rupees)

Redmi Note 10S च्या नवीन 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये इतकी आहे. कंपनीने ट्विटरवर या नवीन व्हर्जनच्या लॉन्चिंगची माहिती शेअर केली आहे. हा फोन Mi.com, Amazon India आणि Mi Homes स्टोअर्सवर उपलब्ध असेल. आज (3 डिसेंबर) दुपारी 12 वाजल्यापासून या फोनचा पहिला सेल लाईव्ह झाला आहे. लॉन्च ऑफरमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरावर आणि EMI सह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल.

Redmi Note 10S चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

  • Redmi Note 10S मध्ये फुल एचडी + रेजोल्यूशन, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 6.43-इंचांचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल आणि हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारित MIUI 12.5 चालेल.
  • फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
  • Redmi Note 10S MediaTek Helio G95 SoC आधारित असून यामध्ये दोन वेगवेगळे रॅम कॉन्फिगरेशन आहेत.
  • यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • फोनमध्ये IP53 सर्टिफिकेशन आणि डुअल स्टीरियो स्पीकर असू शकतात.
  • हा फोन आयआर ब्लास्टर फीचर्स, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि टाइप सी यूएसबी पोर्टसह येतो.

इतर बातम्या

Twitter, Google, Microsoft ते Adobe… टॉप टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, सिलिकॉन व्हॅलीतला दबदबा वाढतोय

50MP कॅमेरा, 8 GB रॅमसह Redmi Note 11T 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत

(Redmi Note 10S new 8GB RAM 128GB storage Variant launched in India at price of 17499 rupees)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.