बहुप्रतीक्षित Redmi Note 10S आणि Redmi Watch बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Xiaomi कंपनी आज भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन Redmi Note 10S आणि किफायतशीर स्मार्टवॉच Redmi Watch लाँच करणार आहे.
मुंबई : Xiaomi कंपनी आज भारतात त्यांचा नवीन बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस (Redmi Note 10S) आणि किफायतशीर स्मार्टवॉच रेडमी वॉच (Redmi Watch) लाँच करणार आहे. दोन्ही उत्पादने ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे (व्हर्च्युअल इव्हेंट) लाँच केली जातील. रेडमी नोट 10 एस हा स्मार्टफोन रेडमी नोट 10, रेडमी नोट 10 प्रो आणि रेडमी नोट 10 प्रो या स्मार्टफोन्सच्या नोट 10 फॅमिलीत दाखल होणार आहे. यामधील अधिकांश फीचर्स Redmi Note 10 सारखेच असण्याची शक्यता आहे. (Redmi Note 10S, Redmi Watch launching in India, know price and specs)
शाओमीने लॉन्चपूर्वी रेडमी नोट 10 एसची (Redmi Note 10S) अनेक वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप, सुपर AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो G95 SoC, 5000mAh बॅटरी आणि वेगवान चार्जिंग सपोर्टचा समावेश आहे. तर रेडमी वॉच सर्वप्रथम चीनमध्ये लाँच करण्यात आलं होतं आणि शाओमीचं किफायतशीर स्मार्टवॉच म्हणून ते भारतात लाँच केलं जाणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी Mi Watch Revolve भारतात लाँच केलं होतं.
Redmi Note 10S चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
- Redmi Note 10S मध्ये फुल एचडी + रेजोल्यूशन, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह 6.43-इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.
- यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल आणि हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारित MIUI 12.5 चालेल.
- फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
- Redmi Note 10S MediaTek Helio G95 SoC वर चालेल आणि यामध्ये दोन वेगवेगळे रॅम कॉन्फिगरेशन मिळतील.
- यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
- फोनमध्ये IP53 सर्टिफिकेशन आणि डुअल स्टीरियो स्पीकर असू शकतात.
Redmi Watch चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Redmi Watch मध्ये 1.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचं स्क्रीन रिजोल्यूशन 320 x 320 पिक्सल इतकं आहे. Xiaomi ने पुष्टी केली आहे की वॉचमध्ये 200 पेक्षा जास्त वॉच फेस असतील. त्याचे वजन बेल्टसह 35 ग्रॅम आणि बेल्टशिवाय 31 ग्रॅम इतकं असेल.
या वॉचमध्ये आऊटडोर सायकलिंग, इनडोअर सायकलिंग, रनिंग, ट्रेडमिल, वॉकिंग आणि स्विमिंग यासह अनेक स्पोर्ट्स मोड असतील. यात 230mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 12 दिवस चालेल, असा दावा कंपनीने केला आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 2 तासांचा कालावधी लागेल. हे वॉच 24 तास हार्ट रेट मॉनिटर करेल. तसेच 30 दिवसांचा हार्टबीट रिपोर्ट देऊ शकेल.
इतर बातम्या
22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर
अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?
(Redmi Note 10S, Redmi Watch launching in India, know price and specs)