बहुप्रतिक्षित Redmi Note 11T 5G स्मार्टफोन 30 नोव्हेंबरला भारतात लाँच होणार, जाणून घ्या स्पेक्स आणि किंमत
Redmi Note 11T 5G स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज आहे, यााबतची माहिती कंपनीने स्वतः शेअर केली आहे. हा स्मार्टफोन रेडमीच्या लेटेस्ट नोट सीरीजचा भाग आहे, ज्याचे नाव Redmi Note 11 आहे.
मुंबई : Redmi Note 11T 5G स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज आहे, यााबतची माहिती कंपनीने स्वतः शेअर केली आहे. हा स्मार्टफोन रेडमीच्या लेटेस्ट नोट सीरीजचा भाग आहे, ज्याचे नाव Redmi Note 11 आहे. Redmi Note 11 सीरीज अंतर्गत चीनमध्ये Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus असे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. पण Redmi Note 11T 5G भारतात लॉन्च होणार आहे. असे सांगितले जात आहे की हा फोन Redmi Note 11 5G चे रीब्रँडेड व्हर्जन आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे की Redmi Note 11 सिरीज फोन भारतात 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाईल. (Redmi Note 11T 5G to Launch In India on 30 November; know features)
Xiaomi Redmi Note 10T भारतात या वर्षाच्या मध्यात लॉन्च करण्यात आला होता, हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. आता कंपनी आपले अपग्रेड केलेले मॉडेल Redmi Note 11T 5G आणणार आहे. हा मोबाइल फोन मॅट ब्लॅक, स्टारडस्ट व्हाइट आणि एक्वामेरीन ब्लू कलरमध्ये येतो.
Redmi Note 11T 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T 5G मध्ये 6.6 इंचांचा फुल HD + IPS LCD डिस्प्ले आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, त्याचबरोबर स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव सुधारतो. स्क्रीनवर एक पंच होल कटआउट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त असेल. तसेच, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे.
या आगामी डिव्हाइसला 8 GB LPDDR4X RAM आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेज मिळेल. हे डिव्हाऑइस मल्टिपल स्टोरेज ऑप्शन्ससह उपलब्ध असेल, ज्यामध्ये 6GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 128GB चा पर्याय देण्यात आला आहे.
Redmi Note 11T 5G चा प्रोसेसर
हा फोन MediaTek Dimension 810 SoC मधून पॉवर घेईल. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरीदेखील असेल. चीनमध्ये लाँच झालेल्या या डिव्हाइसला 8GB पर्यंत RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळेल.
Break-neck speed for those who live life in the fast lane! Brace yourselves for the arrival of Redmi’s #NextGenRacer. ?
The all-new #5G enabled #RedmiNote11T5G is coming your way on 30.11.2021. ?
Gear up for the race of the season here: ? https://t.co/vG106xqjE7 pic.twitter.com/lTWqYS73rJ
— Redmi India – #RedmiNote11T5G (@RedmiIndia) November 15, 2021
इतर बातम्या
48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Redmi Note 11T 5G to Launch In India on 30 November; know features)