Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेक्स
Redmi ने त्यांचे दोन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत, हा एक ग्लोबल लॉन्च आहे. या दोन उत्पादनांची नावे Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite अशी आहेत. हे दोन्ही स्मार्टवॉच स्वस्त दरात आणि अनेक तगड्या फीचर्ससह येतात.

मुंबई : Redmi ने त्यांचे दोन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत, हा एक ग्लोबल लॉन्च आहे. या दोन उत्पादनांची नावे Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite अशी आहेत. हे दोन्ही स्मार्टवॉच स्वस्त दरात आणि अनेक तगड्या फीचर्ससह येतात. चला तर मग या उत्पादनांबद्दल तपशीलवार माहिती घेऊया. (Redmi Smart Band Pro and Redmi Watch 2 Lite launched, know price and specs)
Redmi Smart band Pro
Redmi Smart Band Pro मध्ये 1.47-इंचांची AMOLED स्क्रीन आहे, जी 194×368 पिक्सेलसह येते. त्याची 282 पिक्सेल डेन्सिटी आहे. तसेच यात 450 पीक ब्राइटनेस आहे. कंपनीने यामध्ये 200mAh बॅटरी दिली आहे, जी 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येते. तसेच, हे वॉच सामान्य वापरावर 20 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतं. या बँडमध्ये पॉवर सेव्हिंग मोडही देण्यात आला आहे.
Redmi Watch 2 Lite
हे रेडमी वॉच 2 चे डाउन व्हर्जन आहे आणि त्याचे नाव रेडमी वॉच 2 लाइट असे आहे. यामध्ये यूजर्सना 1.55 इंच TFT डिस्प्ले मिळेल. त्याचे रिझोल्यूशन 320×360 पिक्सेल आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध आहेत आणि यामध्ये 100 वर्कआउट मोड देण्यात आले आहेत, जे रेडमी वॉच 2 सारखेच आहेत.
यामध्ये इनबिल्ट GPS, SpO2 मॉनिटरिंग फीचर्स, 24-तास हार्ट रेट मॉनिटर ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. हे वॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतं आणि GPS चा सतत वापर केल्यावर 14 तासांचा बॅकअप उपलब्ध आहे.
Pricing and availability
Redmi ने अद्याप या वॉचची किंमत जाहीर केली नाही, तसेच ते कधी उपलब्ध होईल याबद्दलदेखील माहिती देण्यात आलेली नाही. या वॉचची अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल. Redmi Smart Band Pro ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये येईल, तर Redmi Watch 2 Lite ब्लॅक, ब्लू आणि आयव्हरी केस कलरमध्ये येईल.
इतर बातम्या
Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?
(Redmi Smart Band Pro and Redmi Watch 2 Lite launched, know price and specs)