Redmi Smart Band Pro भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड भारतासह जगभरात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारात ठराविक अंतराने नवनवीन स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड लाँच करत आहेत.
मुंबई : स्मार्टवॉच आणि स्मार्ट बँड भारतासह जगभरात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारात ठराविक अंतराने नवनवीन स्मार्टवॉच आणि स्मार्टबँड लाँच करत आहेत. Xiaomi च्या Redmi ब्रँडने गेल्या महिन्यात चीनमध्ये एक ग्लोबल इव्हेंट आयोजित केला होता, ज्यामध्ये Redmi Smart Band Pro आणि Redmi Watch 2 Lite लाँच करण्यात आले होते. आता हा बँड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. (Redmi Smart Band Pro to launch in india on 30th November)
दरम्यान, प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांनी सांगितले आहे की, रेडमी स्मार्ट बँड प्रो लवकरच भारतात लाँच होणार आहे. मात्र, अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत, असा अंदाज वर्तवला जात आहे की हा बँड भारतात 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार्या Redmi Note 11T सोबत लॉन्च केला जाऊ शकतो.
Redmi Smart Band Pro मध्ये 1.47-इंचांची AMOLED स्क्रीन आहे, जी 194×368 पिक्सेलसह येते. त्याची 282 पिक्सेल डेन्सिटी आहे. तसेच यात 450 पीक ब्राइटनेस आहे. कंपनीने यामध्ये 200mAh बॅटरी दिली आहे, जी 14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येते. तसेच, हे वॉच सामान्य वापरावर 20 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह येतं. या बँडमध्ये पॉवर सेव्हिंग मोडही देण्यात आला आहे.
Redmi Watch 2 Lite मध्ये काय आहे खास?
हे रेडमी वॉच 2 चे डाउन व्हर्जन आहे आणि त्याचे नाव रेडमी वॉच 2 लाइट असे आहे. यामध्ये यूजर्सना 1.55 इंच TFT डिस्प्ले मिळेल. त्याचे रिझोल्यूशन 320×360 पिक्सेल आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध आहेत आणि यामध्ये 100 वर्कआउट मोड देण्यात आले आहेत, जे रेडमी वॉच 2 सारखेच आहेत.
यामध्ये इनबिल्ट GPS, SpO2 मॉनिटरिंग फीचर्स, 24-तास हार्ट रेट मॉनिटर ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. हे वॉच सिंगल चार्जवर 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतं आणि GPS चा सतत वापर केल्यावर 14 तासांचा बॅकअप उपलब्ध आहे.
Redmi Watch, Redmi band : Pricing and availability
Redmi ने अद्याप त्यांच्या स्मार्टबँड आणि वॉचची किंमत जाहीर केली नाही, तसेच ते कधी उपलब्ध होईल याबद्दलदेखील माहिती देण्यात आलेली नाही. या वॉचची अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल. Redmi Smart Band Pro ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये येईल, तर Redmi Watch 2 Lite ब्लॅक, ब्लू आणि आयव्हरी केस कलरमध्ये येईल.
इतर बातम्या
48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Redmi Smart Band Pro to launch in india on 30th November)