ड्युअल रियर कॅमेरा अन्‌ 5000mAh बॅटरीसह रेडमीचा ‘हा’ स्मार्टफोन लाँच… भारतात कधी येणार?

रेडमी नोट 11SE लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन अद्याप भारतात लाँच झालेला नाही. मात्र, लवकरच तो भारतातही लाँच होईल, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

ड्युअल रियर कॅमेरा अन्‌ 5000mAh बॅटरीसह रेडमीचा ‘हा’ स्मार्टफोन लाँच... भारतात कधी येणार?
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 1:37 PM

शाओमीने (Xiaomi) आपल्या एका इव्हेंटमध्ये अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. यात रेडमी नोट 11 (Redmi Note 11) सिरीजमधील एक नवीन स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आला आहे. कंपनीने नवीन लाँच केलेल्या स्मार्टफोनला रेडमी नोट 11 एसई (Redmi Note 11SE) असे नाव दिले आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा बजेट 5G स्मार्टफोन अ‍ॅडेप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक प्रोसेसरसह येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आउट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.

काय आहे किंमत?

Redmi Note 11SE 999 युआन म्हणजेच सुमारे 11,640 रुपयेमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन शॅडो ब्लॅक आणि डीप ब्लू कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच्या ग्लोबल लाँचिंगबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जबरदस्त स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11SE 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5 इंच फुल एचडी स्क्रीन सह दाखल होणार आहे. त्याचा डिसप्ले अॅडेप्टिव्ह रिफ्रेश रेटसह ग्राहकांना मिळणार आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर  MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येतो. त्याची इंटरनल मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. यामध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. हे Android 11 आधारित MIUI 12 वर काम करणार आहे.

हे सुद्धा वाचा

48 मेगापिक्सल कॅमेरा

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर Redmi Note 11SE च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. यासोबत 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर आहे. फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.