AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरदस्त फीचर्ससह दमदार ऑडियो क्वालिटी, Redmi TV X50, X55, X65 भारतात लाँच

शाओमी कंपनीने आपला स्मार्ट टीव्ही पोर्टफोलिओ भारतात वाढवत पहिला रेडमी टीव्ही लाँच केला आहे. (Redmi TV X Series )

जबरदस्त फीचर्ससह दमदार ऑडियो क्वालिटी, Redmi TV X50, X55, X65 भारतात लाँच
Redmi TV X Series
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 4:38 PM

मुंबई : शाओमी कंपनीने आपला स्मार्ट टीव्ही पोर्टफोलिओ भारतात वाढवत पहिला रेडमी टीव्ही लाँच केला आहे. हा स्मार्टफोन टीव्ही तीन स्क्रीन साईजमध्ये लाँच केला आहे. ज्यात 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचांच्या स्मार्ट टीव्हीचा समावेश आहे. रेडमी टीव्ही X सिरीजमध्ये हे तिन्ही प्रकार लॉन्च केले गेले आहेत. एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये हा टीव्ही लाँच करण्यात आला आहे. हा टीव्ही डॉल्बी व्हिजन, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि एचडीआर 10+ सपोर्ट आणि 30 डब्लू स्पीकर्ससह येतो. (Redmi TV X50, X55, X65 launched in India, check Price and specs)

शाओमी आतापर्यंत एमआय सीरिज अंतर्गत टीव्ही लाँच करत होती, परंतु आता कंपनीने रेडमी लाइनअप अंतर्गत स्मार्ट टीव्ही लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, इलेक्ट्रॉनिक निर्मात्या कंपनीला खात्री आहे की, दोन्ही सिरीजमधील टीव्हीच्या लाँचिंगमध्ये काही काळ अंतर राहील.

Redmi TV X50, X55, X65 च्या किंमती

रेडमी टीव्ही X50 ची किंमत 32,999 रुपये, X55 ची किंमत 38,999 रुपये आणि X65 ची किंमत 57,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तिन्ही टीव्हींचा सेल 26 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Mi.com, अमेझॉन इंडिया, एमआय स्टोअर्सवर सुरु होईल. हे टीव्ही खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांनी ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास त्यांना 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

तिन्ही टीव्हींमधील फीचर्स

रेडमी टीव्ही एक्स सीरिज 4K व्हिडिओला सपोर्ट करतो. त्याच वेळी, आपल्याला 3840 × 2160 रिजोल्यूशन मिळेल. स्मार्ट टीव्हीमध्ये शाओमीचे विविड पिक्चर इंजिन आणि एचडीआर 10 + सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्ट टीव्ही डॉल्बी व्हिजन आणि MEMC सह येतो. टीव्हीमध्ये 64 बिट क्वाड कोर प्रोसेसर, सोबत 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

ऑडिओच्या बाबतीत, या टीव्हीमध्ये आपल्याला 30W स्पीकर्स मिळतात जे डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह डिझाईन करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात एचडीएमआय 2.1 पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ 5.0 मिळेल. त्याच वेळी, त्याचा एक HDMI पोर्ट eARC ला सपोर्ट करतो. टीव्ही शाओमीच्या पॅचवाल इंटरफेसवर काम करतो आणि Google असिस्टंटला सपोर्ट करतो.

रेडमीचा टीव्ही कंट्रोल अगदी एमआय बॉक्स 4K रिमोट कंट्रोलसारखाच आहे. यात आपल्याला नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओसाठी डेडिकेटेड हॉटकीज मिळतील. यात तुम्हाला गुगल असिस्टंट बटणही मिळेल. शाओमीने यामध्ये पिक्चर इन पिक्चर मोडदेखील अॅड केलं आहे.

इतर बातम्या

लाँचिंगपूर्वीच Poco X3 Pro ची किंमत आणि फीचर्स लीक

5 हजाराहून कमी किंमतीत खरेदी करा Samsung Galaxy चा फोन, धमाकेदार आहे ऑफर

48MP कॅमेरा, 6,000 mAh बॅटरी, किंमत फक्त 9999, Moto चा दमदार फोन विक्रीसाठी उपलब्ध

(Redmi TV X50, X55, X65 launched in India, check Price and specs)