जिओचा नवीन धमका, जिओ क्वाईनमधून बंपर कमाई, मोफत असे मिळावा Jio Coin
Free Jio Coin: जिओ क्वाईन हे रिवॉर्ड-आधारित टोकन आहे. त्यामुळे युजर Jio च्या मोबाइल आणि इंटरनेट-आधारित अॅप्ससह गुंतून राहण्याच्या बदल्यात मिळवू शकतात. हे टोकन रिलायन्स मोबाईल रिचार्ज, रिलायन्स स्टोअर्स, JioMart आणि रिलायन्स पेट्रोल पंपांवर खरेदीसाठी वापरले जाऊ शकते.
![जिओचा नवीन धमका, जिओ क्वाईनमधून बंपर कमाई, मोफत असे मिळावा Jio Coin जिओचा नवीन धमका, जिओ क्वाईनमधून बंपर कमाई, मोफत असे मिळावा Jio Coin](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Mukesh-Ambani-2.jpg?w=1280)
Free Jio Coin: क्रिप्टो मार्केटमध्ये जिओचे क्वाईन येणार आहे. ही क्वाईन मोफत मिळवायची असतील, तर तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. मुकेश अंबानी यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु जिओ कॉईन जिओ प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहे.
दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी लवकरच क्रिप्टो मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहेत. जिओ क्वाईन सोबत त्यांची क्रिप्टो मार्केटमध्ये एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिओ क्वाईनसंदर्भात बातम्या सुरु आहेत. काही रिपोर्टनुसार, जिओ क्वाईन पुढील बिटक्वाईन बनू शकते. आता हे जिओ क्वाईन मोफत कसे मिळवता येणार? जाणून घेऊ या ही प्रक्रिया…
जिओ क्वाईनसंदर्भात अजून कंपनीकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. परंतु तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर JioSphere अॅप सुरु केल्यावर काही संदेश मिळणार आहे. स्क्रीनवर जिओ क्वाइन कमवण्यासाठी साइन-इन करण्याचा संदेश येईल.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Ram-Mandir.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prayagraj-Stampede.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/sc-hsc-maharashtra-board-hall-ticket.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Narayan-Rane.jpg)
अशी असणार प्रक्रिया…
- JioSphere अॅप तुमच्या मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड करा. हा अॅप अॅड्रॉयड यूजर्ससाठी गूगल प्ले स्टोर आणि आयफोन यूजर्ससाठी अॅपल अॅप स्टोरवर उपलब्ध आहे.
- अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाऊंट तयार करावे लागणार आहे. जेव्हा तुम्ही साइन-अप कराल, त्यावेळी तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाइल क्रमांक विचारले जाईल. फोन नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यावर तुमचे खाते रजिस्टर होईल.
- तुमचे अकाउंट बनल्यानंतर इंटरनेट सर्विंगसाठी JioSphere ब्राउजरचा वापर करा.
- तुम्ही जस-जसे अॅप ब्राउजरचा वापर कराल, तस-तसे तुमच्या खात्यात रिवॉर्ड्स म्हणून जिओ क्वाइन मिळण्यास सुरुवात होणार आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मोफत जिओ क्वाईन अॅपमध्ये दिलेल्या पॉलीगॉन वॉलेटमध्ये जमा होतील.
अॅपवर खाते तयार करताना अॅपच्या सेटिंग्जमध्ये Jio Coin साठी ऑप्ट-इन पर्याय पाहिला असणार आहे. त्यामुळे जिओ कॉइन लवकरच क्रिप्टो मार्केटमध्ये स्प्लॅश करणार आहे. त्यासाठीच मोफत Jio Coin साठी साइन इन करण्यास सांगितले जात आहे.
काय आहे जिओ क्वाईन
जिओ क्वाईन हे रिवॉर्ड-आधारित टोकन आहे. त्यामुळे युजर Jio च्या मोबाइल आणि इंटरनेट-आधारित अॅप्ससह गुंतून राहण्याच्या बदल्यात मिळवू शकतात. हे टोकन रिलायन्स मोबाईल रिचार्ज, रिलायन्स स्टोअर्स, JioMart आणि रिलायन्स पेट्रोल पंपांवर खरेदीसाठी वापरले जाऊ शकते.