JioPhone Next : सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन ‘या’ दिवशी बाजारात, लाँचिंगआधी जाणून घ्या फोनमधील 8 महत्त्वाचे फीचर्स

रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेक जायंट गुगलसोबत भागीदारी करून भारतासाठी तयार केलेला 'जिओफोन नेक्स्ट' हा स्मार्टफोन 10 सप्टेंबर (शुक्रवार) ला लॉन्च केला जाईल.

JioPhone Next : सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन 'या' दिवशी बाजारात, लाँचिंगआधी जाणून घ्या फोनमधील 8 महत्त्वाचे फीचर्स
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 6:30 PM

मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेक जायंट गुगलसोबत भागीदारी करून भारतासाठी तयार केलेला ‘जिओफोन नेक्स्ट’ हा स्मार्टफोन 10 सप्टेंबर (शुक्रवार) ला लॉन्च केला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे की, जिओफोन नेक्स्ट हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल. (Reliance JioPhone Next willon 10th august, 8 key features you should know)

जूनमध्ये आरआयएलच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अंबानी यांनी यावर जोर दिला की, भारताला ‘2 जी मुक्त’ करण्यासाठी अल्ट्रा-अफोर्डेबल 4 जी स्मार्टफोन आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या फोनची 8 महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगणार आहोत.

JioPhone Next मधील 8 महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • JioPhone नेक्स्ट 3,499 रुपयांच्या अंदाजे किंमतीसह लाँच केला शकतो. पण रिलायन्स जिओ या फोनची किंमत कमी करण्यासाठी अधिक ऑफर देऊ शकते.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदाराला 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम व्हेरिएंट असे दोन पर्याय मिळतील, अशी अपेक्षा आहे. इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये, जिओ 16GB व्हेरिएंट आणि 32GB व्हेरिएंट लॉन्च करू शकते.
  • डिव्हाइसला HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला जाईल.
  • स्मार्टफोन फास्ट, उच्च दर्जाच्या कॅमेरऱ्यासह सज्ज आहे, ज्याद्वारे रात्री आणि कमी प्रकाशात क्लियर फोटो काढता येतील. फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची मूळ कंपनी असलेल्या स्नॅपसोबत गुगलनेही भागीदारी केली आहे, जेणेकरुन स्नॅपचॅट लेन्स थेट फोन कॅमेराला देता येईल.

इतर बातम्या

किफायतशीर किंमतीत प्रीमियम लूक, ढासू डिझाईन, जबरदस्त फीचर्ससह नवीन स्मार्टवॉच बाजारात

5G लाँचिंगनंतरही देशात 4G चा दबदबा कायम राहणार, Ookla च्या अहवालात मोठा खुलासा

Realme 9 सिरीज झाली टीज, पुढच्या आठवड्यात फोनच्या स्पेसिफिकेशनबाबत होईल खुलासा

(Reliance JioPhone Next willon 10th august, 8 key features you should know)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.