Reliance Jio | रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, जाणून घ्या डिटेल माहिती
दररोजच्या खर्चानुसार ग्राहकांना जिओच्या 3 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल माहिती देणार आहोत. जिओने दररोज 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा देणारे स्वस्त रिचार्ज प्लान आणले आहेत. (Reliance Jio's three cheapest recharge plans, find out the details)
मुंबई : रिलायन्स जिओच्या अनेक उत्तम रिचार्ज योजना आहेत. जिओकडे दररोज 1 जीबीपासून 3 जीबी डेटा देणारे रिचार्ज प्लान आहे. जिओची प्रीपेड योजना 129 रुपयांपासून सुरू होईल. जिओच्या प्रीपेड योजनांमध्ये 24 दिवस ते 365 दिवसांपर्यंतची वैधता देण्यात आली आहे. दररोजच्या खर्चानुसार ग्राहकांना जिओच्या 3 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल माहिती देणार आहोत. जिओने दररोज 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा देणारे स्वस्त रिचार्ज प्लान आणले आहेत. (Reliance Jio’s three cheapest recharge plans, find out the details)
3 जीबी डेटा देण्याचा स्वस्त प्लान
जिओकडे दररोज 3 जीबी डेटा देणारे तीन स्वस्त प्लान आहेत. दररोजच्या खर्चानुसार सांगायचे झाले तर जिओची सर्वात स्वस्त योजना 999 रुपयेवाली आहे. जिओच्या दररोज 3 जीबी डेटा देण्याच्या या योजनेत दररोजचा खर्च 11.89 रुपये आहे. जिओच्या 999 रुपयांच्या योजनेची वैधता 84 दिवसांची आहे. या योजनेत एकूण 252 जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. योजनेत दररोज 100 एसएमएस पाठविण्याची तरतूद आहे. तसेच, जिओ अॅप्सची सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे. तथापि, या योजनेत डिस्ने + हॉटस्टार (Disney+ Hotstar) सदस्यता उपलब्ध नाही.
2 जीबी डेटा देणारा स्वस्त प्लान
रिलायन्स जिओकडे दररोज 2 जीबी डेटा देणारी 6 प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. दैनंदिन खर्चानुसार यातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 2399 रुपये आहे. जिओच्या दररोज 2 जीबी डेटा देण्याच्या या योजनेत प्रत्येक दिवसाचा खर्च 6.57 रुपये आहे. जिओच्या या योजनेची वैधता 365 दिवस आहे. म्हणजेच ही योजना वर्षभर चालते. योजनेमध्ये एकूण 730 जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देखील उपलब्ध आहे. योजनेत दररोज 100 एसएमएस पाठविण्याची तरतूद आहे. तसेच, जिओ अॅप्सना विनामूल्य सदस्यता मिळेल.
1.5 जीबी डेटा ऑफर करणारा प्लान
दररोज 1.5 जीबी डेटा प्रदान करणार्या रिलायन्स जिओमध्ये 5 प्रीपेड रिचार्ज योजना आहेत. यातील सर्वात स्वस्त रीचार्ज प्लॅन म्हणजे दिवसाच्या खर्चानुसार 2121 रुपये. दररोज 1.5 जीबी डेटा देण्याऱ्या जिओच्या या योजनेत दर दिवसाचा खर्च 6.31 रुपये आहे. जिओच्या या योजनेची वैधता 336 दिवस आहे. म्हणजेच ही योजना 11 महिने चालते. जिओच्या या योजनेत एकूण 504 जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेत कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगचा लाभ देण्यात आला आहे. योजनेत दररोज 100 एसएमएस पाठविण्याची तरतूद आहे. याव्यतिरिक्त, जिओ अॅप्सची सदस्यता विनामूल्य उपलब्ध आहे. (Reliance Jio’s three cheapest recharge plans, find out the details)
दिया मिर्झा वैभव रेखीपासून पहिल्यांदाच होणार आई, मालदिवहून बेबी बंपचे फोटो पोस्ट#DiaMirza #vaibhavrekhi #maldivesphotodiary2021https://t.co/Y41PTHfeib
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2021
इतर बातम्या
Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा बोल्ड अंदाज, लोक म्हणाले ‘गाडीवाला आया घर से कचरा निकाल’
इन्स्टाग्रामने आपल्या रील्समध्ये जोडले टिकटॉकचे हे दमदार फिचर, असा करु शकता वापर