रॉयल एनफिल्डच्या दोन नव्या बाईक बाजारात
मुंबई : रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांची भारतात काही कमी नाही. रॉयल एनफिल्ड हा ब्रँड तर बाईक विश्वात सर्वाधिक लोकप्रिय आहे. भारतातील बाईक चाहत्यांची पहिली पसंती नेहमीच रॉयल एनफिल्डला राहिली असते. त्यामुळे ही कपंनी देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अधिक अॅडव्हान्स अशा बाईक लॉंच करत असते. मात्र, अनेक दिवसांपासून रॉयल एनफिल्डचा कुठला नवा मॉडेल बाजारात आला नव्हता. पण […]
मुंबई : रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांची भारतात काही कमी नाही. रॉयल एनफिल्ड हा ब्रँड तर बाईक विश्वात सर्वाधिक लोकप्रिय आहे. भारतातील बाईक चाहत्यांची पहिली पसंती नेहमीच रॉयल एनफिल्डला राहिली असते. त्यामुळे ही कपंनी देखील वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अधिक अॅडव्हान्स अशा बाईक लॉंच करत असते. मात्र, अनेक दिवसांपासून रॉयल एनफिल्डचा कुठला नवा मॉडेल बाजारात आला नव्हता. पण आता रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांना अधिक काळ वाट बघण्याची गरज नाही, कारण रॉयल एनफिल्डने नुकत्याच आपल्या दोन नवीन बाईक लॉंच केल्या आहेत.
रॉयल एनफिल्डने बाजारात नुकत्याच आपल्या ‘650 ट्विन्स’ बाईक भारतात लॉंच केल्या. कंपनीने ‘इंटरसेप्टर 650’ आणि ‘कॉन्टिनंटल जीटी 650’ या दोन बाईक बाजारात उतरवल्या आहेत. ‘इंटरसेप्टर 650’ आणि ‘कॉन्टिनंटल जीटी 650’ यांना बेस, कस्टम आणि क्रोम नावाच्या तीन वेरीयंटमध्ये लॉंच करण्यात आलं. रॉयल एनफिल्डच्या प्रोफाईलमधल्या या सर्वात चांगल्या बाईक आहेत.
‘इंटरसेप्टर 650’च्या बेस वेरियंटची किंमत 2 लाख 50 हजार, कस्टम वेरयंटची किंमत 2 लाख 57 हजार तर क्रोम वेरियंटची किंमत 2 लाख 70 हजार इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच ‘कॉन्टिनंटल जीटी 650’च्या बेस वेरियंटची किंमत 2 लाख 65 हजार, कस्टम वेरियंटची किंमत 2 लाख 72 हजार तर क्रोम वेरीयंटची किंमत 2 लाख 85 हजार इतकी आहे. या किमती केवळ एक्स शोरूमच्या आहेत.
या दोन्ही गाडींची बुकिंग मागील महिन्यातच सुरु झाली होती. भारतात या बाईकसोबत तीन वर्षांची वॉरंटी आणि 40000 किमीपर्यंत तीन वर्षांचा रोड साईड असिस्टंस देखिल मिळेल. रॉयल एनफिल्डच्या ऑथराइज्ड डिलर्सनुसार या गाड्यांची बुकिंग 5 हजार रूपयांपासून सुरु आहे.
निवडक फीचर्स :
– यांमध्ये मॉडर्न ट्विन-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. दोन्ही बाईकमध्ये 648cc, ऑईलकूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे, जे 7,250rpm वर 47bhp एवढी पावर आणि 5,250rpm वर 52Nm टॉर्क जनरेट करते.
– 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच आहे.
– पेट्रोल शिवाय इंटरसेप्टर 650 चं वजन 202 किलोग्राम आहे, तर कॉन्टिनंटल जीटी 650 चं वजन 198 किलोग्राम आहे.
– स्पीड : याची टॉप स्पीड 163kmph इतकि आहे.
– सस्पेंशनसाठी यात टेलेस्कॉपिक फॉर्क्स अप फ्रंट आणि रिअरमध्ये गॅस चार्ज्ड ट्विन शॉक्स देण्यात आले आहेत.
– बाईकच्या फ्रंटमध्ये 320mm ची डिस्क आणि रिअरमध्ये 240mm डिस्क देण्यात आली आहे.