जर तुम्हीही PS5 प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे. सोनीनं (sony PS5) आपल्या प्ले स्टोअर 5 म्हणजेच PS5 ला पुन्हा रिस्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने याच्या विक्रीची तारीख देखील घोषित केली असून PS5 22 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यात त्याच्या दोन्ही डिजिटल आणि स्टँडर्ड व्हर्जनचा (Standard version) समावेश असणार आहे. मागील वेळेप्रमाणे यंदाही सोनी, सोनी प्लेस्टेशन 5 शॉप ॲट एससी वेबसाइड, अमेझॉन, विजय सेल्स, गेम्स द शॉप, रिलायंस डिजिटल, क्रोमा आणि प्री-पेड गेम कार्ड (Pre-paid game card) आदींच्या माध्यमातून विक्री सुरु करणार् आहे. ज्याना PS5 ची प्री-बुकींग करायची आहे, तेदेखील विविध वेबसाईट्सच्या माध्यमातून बुकींग करु शकणार आहेत.
भारतात PS5 च्या स्टँडर्ड व्हर्जनची किंमत जवळपास 49, 990 रुपये आहे. ज्यासोबत कंपनी तुम्हाला 4, 999 रुपयांचा टूरिस्मो 7 देखील देत आहे. ऑफरच्या माध्यमातून कंपनी खरेदीदारांना 499 रुपयांचे डिस्काउंटदेखील देत आहे. याशिवाय डिजिटल व्हर्जनची 39,990 रुपयांमध्ये विक्री केली जात आहे. सोनी PS5 ची विक्री जागतिक पातळीवर 2020 च्या हॉलिडे सिजनमध्ये सुरु झाली होती. भारतात कंपनीने मागील वर्षी याची रिटेल विक्री सुरु केली होती. PS5 गेमिंग युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. परंतु असे असूनही याची खूपच मर्यादीत स्वरुपात जगभरात विक्री केली जात असते. याच्या विक्रीला सुरुवात होताच काही मिनिटातच अनेक वेबसाइटवर हे उत्पादन आउट ऑफ स्टॉक दाखवत असतात.
1. एक नवीन PS5 प्री-बुक करण्यासाठी आपल्या मित्राची मदत घ्यावी. बुक करताना एक अजून जोडीदाराला आपल्यासोबत तयार ठेवा. ‘एक पेक्षा दोन भले’ या युक्तीचा वापर केल्यास तुम्हाला PS5 मिळण्याची शक्यता अजून वाढेल.
2. आपल्या सोबतच्या जोडीदाराला अजून एक वेगळे डिव्हाईस द्यावे, ज्याच्या माध्यमातून तो बुकींगसाठी प्रयत्न करु शकेल. त्याला स्टेबल इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करुन घ्यावी.
3. याशिवाय तुम्ही गेमिंग कंसोलला प्री-बुक करण्यासाठी अनेक मार्केटप्लेसचाही वापर करुन शकतात. यासोबतच एकापेक्षा अधिक टॅब ओपन करुन बुकींग करुन शकतात.
4. अनेक वेळा आपण बुकींग करतो तेव्हा आपल्याला आउट ऑफ स्टॉकचा पर्याय दिसू शकतो. यामुळे अनेक लोक आपले ट्रांजेक्शन पूर्ण करु शकत नाही. अशा वेळी थोडावेळ वाट पाहू शकतात. कधी-कधी सर्व्हरवर अतिरिक्त भार वाढल्यामुळे सिस्टीम स्लो होउ शकते. अनेकदा वेबसाइट दुपारी बारा वाजेनंतर नियमित स्वरुपात सुरु होत असते.
Micromax : मायक्रोमॅक्सचा ‘हा’ बजेटफोन लवकरच लाँच होणार, किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घ्या