Samsung TV : ‘सॅमसंग बिग टीव्‍ही डेज’ मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सवरील आकर्षक ऑफर्स, जाणून घ्या…

सॅमसंग क्‍यूएलईडी टेलिव्हिजन्‍स 10 वर्षांच्‍या नो-स्क्रिन बर्न-इन वॉरंटीसह येतील. ग्राहकांना निवडक सॅमसंग टीव्‍हींवर 3 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल.

Samsung TV : 'सॅमसंग बिग टीव्‍ही डेज' मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सवरील आकर्षक ऑफर्स, जाणून घ्या...
'सॅमसंगImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:12 PM

मुंबई : सॅमसंग (Samsung) हा भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍ड (Electronics brand) त्‍यांचे प्रिमिअम, मोठ्या स्क्रिन आकाराचे निओ क्‍यूएलईडी 8के, निओ क्‍यूएलईडी, क्‍यूएलईडी, दि फ्रेम व क्रिस्‍टल यूएचडी टीव्‍हींवरील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय सॅमसंग बिग टीव्‍ही डेज ऑफर्ससह (Offers) परतला आहे. या ऑफर्स देशभरातील सर्व आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक रिटेलर स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील. लिमिटेड पीरियड ऑफर ग्राहकांना 30 जून 2022 पर्यंत सॅमसंगच्‍या टीव्‍हींच्‍या प्रिमिअम रेंजवर आकर्षक ऑफर्स, तसेच अशुअर्ड गिफ्ट्सचा लाभ घेण्‍याची संधी देईल. या आकर्षक ऑफर्समध्‍ये 75-इंच व त्‍यावरील आकाराच्‍या निओ क्‍यूएलईडी 8के टीव्‍हींवर 1 लाख  31 हजार 999 रूपये किंमतीचा गॅलॅक्‍सी एस22 अल्‍ट्रा स्‍मार्टफोन मिळण्‍याचा समावेश आहे. ग्राहकांना निओ क्‍यूएलईडी, क्‍यूएलईडी टीव्‍ही, 75-इंच फ्रेम टीव्‍ही आणि क्रिस्‍टल 4के यूएचडी टीव्‍हींचे 75-इंच व त्‍यावरील आकाराचे मॉडेल्‍स अशा निवडक मॉडेल्‍सच्‍या खरेदीवर 19 हजार 999 रूपये किंमतीचा गॅलॅक्‍सी ए22 5जी स्‍मार्टफोन देखील मिळेल. 50-इंच निओ क्‍यूएलईडी टीव्‍ही, 50-इंच किंवा 55-इंच क्‍यूएलईडी टीव्‍ही खरेदी करणा-या ग्राहकांना 8 हजार 900 रूपये किंमतीचा कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी स्लिमफिट कॅमेरा देखील मिळेल.

20 टक्‍के कॅशबॅक

ग्राहक सॅमसंगच्‍या 50-इंच व त्‍यावरील आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सच्या प्रिमिअम रेंजवर जवळपास 20 टक्‍के कॅशबॅक आणि 1,990 रूपये इतक्‍या कमी किंमतीपासून सुरू होणा-या सुलभ ईएमआय पर्यायांचा लाभ घेऊ शकतात. ”मागील काही वर्षांमध्‍ये ग्राहकांच्‍या कन्‍टेन्‍ट पाहण्‍याच्‍या आवडीमध्‍ये बदल होण्‍यासोबत घरामध्‍येच मनोरंजनाचा आनंद घेणे आपल्‍या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. मोठ्या स्क्रिन आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍स उल्‍लेखनीयरित्‍या सर्वोत्तम व्‍युईंग अनुभव देण्‍यासोबत लिव्हिंग स्‍पेसेसचा स्‍टाइल दर्जा उंचावतात. बिग टीव्‍ही डेज ऑफर्स पुन्‍हा आणत आमचा ग्राहकांना आकर्षक डील्‍स व सर्वोत्तम अशुअर्ड गिफ्ट्ससह आमच्‍या दर्जात्‍मक, सर्वात प्रिमिअम टेलिव्हिजन्‍स देण्‍याचा मनसुबा आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्‍यवसायाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

या ऑफर्सचा भाग म्‍हणून सॅमसंग क्‍यूएलईडी टेलिव्हिजन्‍स 10 वर्षांच्‍या नो-स्क्रिन बर्न-इन वॉरंटीसह येतील. ग्राहकांना निवडक सॅमसंग टीव्‍हींवर 3 वर्षांची वॉरंटी देखील मिळेल.

हे सुद्धा वाचा

निओ क्‍यूएलईडी टीव्‍ही श्रेणी

2022 श्रेणीसह सॅमसंग अद्वितीय व्‍युईंग अनुभवासाठी डिझाइन व प्रिमिअम वैशिष्‍ट्यांचे परिपूर्ण संयोजन असलेल्‍या त्‍यांच्‍या निओ क्‍यूएलईडी टेलिव्हिजन्‍स सादर करत आहे. निओ क्‍यूएलईडीमध्‍ये अत्‍याधुनिक क्‍वॉन्‍टम मॅट्रिक्‍स टेक्‍नोलॉजी प्रोसह शक्तिशाली न्‍यूरल क्‍वॉन्‍टम प्रोसेसर 8के आणि रिअल डेप्‍थ एन्‍हान्‍सर आहे. सॅमसंगच्‍या 2022 निओ क्‍यूएलईडी टीव्‍हींमध्‍ये स्‍मार्टर व इंटेलिजण्‍ट वैशिष्‍ट्ये आणि युजर इंटरफेस आहे, जे सॅमसंग टीव्‍हींना कन्‍टेन्‍ट पाहण्‍यासाठी, डिवाईसेसवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी, गेम्‍स खेळण्‍यासाठी, वर्कआऊट करण्‍यासाठी मुख्‍य हब बनवतात.

डॉल्‍बी अ‍ॅटमॉस

ग्राहकांना सिनेमॅटिक व्‍युईंग अनुभव देण्‍यासाठी उत्‍पादकांनी सॅमसंग निओ क्‍यूएलईडीची साऊंड सिस्टिम सक्षम केली आहे, जी अत्‍यंत सर्वोत्तम व वास्‍तववादी ऑडिओ अनुभवांची निर्मिती करू शकते. ग्राहक आता सर्वोत्तम डॉल्‍बी अ‍ॅटमॉस अनुभवासह अद्वितीय ३डी सराऊंड साऊंडचा आनंद घेऊ शकतात.

व्हिडिओ कॉलिंग आणि बिल्‍ट-इन आयओटी हब

निओ क्‍यूएलईडी टीव्‍हींच्‍या नवीन श्रेणीमध्‍ये बिल्‍ट-इन आयओटी हब आहे, जे ग्राहकांना टीव्‍हीच्‍या माध्‍यमातून स्‍मार्ट पद्धतीने घरावर नियंत्रण ठेवण्‍याची सुविधा देते. हा टीव्‍ही तुम्‍हाला घरातील सर्व डिवाईसेस, तसेच थर्ड-पार्टी डिवाईसेस तपासण्‍याची सुविधा देतो. ग्राहक वापरण्‍यास सुलभ स्लिमफिट कॅम (टीव्‍ही वेबकॅम)च्‍या माध्‍यमातून मोठ्या टीव्‍ही स्क्रिनवर व्हिडिओ कॉलिंग किंवा वेब कॉन्‍फरन्‍सचा आनंद घेऊ शकतात. हा कॅमेरा टीव्‍हीची डिझाइन किंवा व्‍युईंग अनुभवाबाबत तडजोड न करता जोडता येऊ शकतो.

गेमर्स पॅराडाइज

सॅमसंगची टेलिव्हिजन्‍सची निओ क्‍यूएलईडी श्रेणी टेलिव्हिजनपेक्षा अधिक आहे. हा टीव्‍ही प्रत्‍येक गेमर्सचे स्‍वप्‍न आहे. 2022 निओ क्‍यूएलईडी श्रेणी खेळाडूंना विनाव्‍यत्‍यय सुलभपणे गेम खेळण्‍याचा आनंद देते. गेम बार खेळाडूंना गेमिंग स्‍टेटसवर देखरेख ठेवण्‍याची आणि सुलभपणे गेम सेटिंग्‍ज सानुकूल करण्‍याची सुविधा देतो. तसेच झूम-इन मोड आणि अल्‍ट्रा-वाइड व्‍ह्यूसह कोणत्‍याही बारीक-सारीक गोष्‍टी चुकत नाही. याचे श्रेय मोशन एक्‍सलरेटर टर्बो प्रो वैशिष्‍ट्याला जाते, जे गेमर्समध्‍ये निओ क्‍यूएलईडीप्रती आवड निर्माण करते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.