50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Samsung चा परवडणारा 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Samsung Galaxy A13 5G मोबाईल फोन लॉन्च करण्यात आला आहे, जो किफायतशीर सेगमेंटमधील स्मार्टफोन आहे. या मोबाईलची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
मुंबई : Samsung Galaxy A13 5G मोबाईल फोन लॉन्च करण्यात आला आहे, जो किफायतशीर सेगमेंटमधील स्मार्टफोन आहे. या मोबाईलची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेंशन 700 चिपसेट वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना यामध्ये 90hz रिफ्रेश रेटसह उत्तम डिस्प्ले मिळेल. (Samsung Galaxy A13 5G launched in US with 50MP cam, 5000mAh Battery, Coming soon in India)
Samsung Galaxy A13 5G ची किंमत
Samsung Galaxy A13 5G ची किंमत $249.99 (जवळपास 18,700) इतकी आहे आणि हा फोन सध्या यूएसमध्ये लाँच करण्यात आला आहे. 3 डिसेंबरपासून त्याची विक्री फक्त यूएसमध्ये सुरू होईल. मात्र, त्याच्या कलर वेरिएंटबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
Samsung Galaxy A13 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A13 5G मध्ये 6.5 इंचाचा Infinity V HD Plus डिस्प्ले आहे, ज्याचं रिझोल्यूशन 90Hz आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंगचा चांगला एक्सपीरियन्स प्रदान करतो. यासोबतच यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने मोबाईल अनलॉक करण्याचे काम करतो. हा मोबाइल कंपनीच्या OneUI कस्टम स्किनवर काम करतो, जो Android 11 वर आधारित आहे. तसेच यात Knox सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy A13 5G ची बॅटरी
Samsung Galaxy A13 5G मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच, यामध्ये NFC सपोर्ट आहे, ज्यामुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यात मदत होते. यात ड्युअल बँड वाय-फाय 802 सपोर्ट आहे. यात 3.5Mn ऑडिओ जॅक आहे. हा एक परवडणारा 5G मोबाईल फोन आहे.
Samsung Galaxy A13 5G चा कॅमेरा सेटअप
Samsung Galaxy A13 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आहे. तसेच, यात 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. यात 2 मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आहे, जो f/2.4 अपर्चरसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनीने 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो f/2.0 अपर्चर सह येतो.
चीनी कंपन्यांना टक्कर
सॅमसंगचे अनेक 5G स्मार्टफोन असले तरी भारतासह जागतिक बाजारपेठेत कंपनी आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन सादर करत आहे. अशा परिस्थितीत सॅमसंग रेडमी, रियलमी ओप्पो सारख्या चीनी कंपन्यांशी स्पर्धा करण्याचा विचार करत आहे.
इतर बातम्या
50MP कॅमेरा, 8 GB रॅमसह Redmi Note 11T 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर घरी येणार, सेवा पूर्णपणे मोफत
(Samsung Galaxy A13 5G launched in US with 50MP cam, 5000mAh Battery, Coming soon in India)