5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात

सॅमसंग गॅलेक्सी A21s (Samsung galaxy A21s) च्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात
Samsung galaxy A21s
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 7:40 PM

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी A21s (Samsung galaxy A21s) च्या 6 जीबी रॅम व्हेरिएंटच्या किंमतीत कपात झाली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नवीन मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A21s ची किंमत भारतात कमी करण्यात आली आहे. (Samsung galaxy A21s price reduced bye 2500 rupees, check where will you get deal)

मुंबईस्थित रिटेलर महेश टेलिकॉमने ट्विटरवर फोनच्या किंमतीत कपात केल्याची माहिती दिली आहे. ट्विटद्वारे असे सांगण्यात आले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी ए 21 एस आता 2,500 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. हा फोन गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच करण्यात आला होता आणि तो दोन व्हेरिएंटमध्ये येतो. विशेष बाब म्हणजे फोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

Samsung Galaxy A21s दोन व्हेरिएंट 4GB रॅम + 64GB आणि 6GB रॅम +64GB स्टोरेजमध्ये येतात. दोन्ही मॉडेल्सच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. ग्राहक आता 4 जीबी मॉडेल 13,999 रुपयांमध्ये आणि 6 जीबी व्हेरिएंट 16,490 रुपयांना खरेदी करु शकतात. फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन कसे आहेत ते जाणून घेऊया…

Samsung Galaxy A21s मध्ये 6.5-इंच HD + Infinity-O डिस्प्ले आहे, ज्याचा अॅस्पेक्ट रेशियो 20: 9 आहे. त्याची स्क्रीन 720X1,600 पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. प्रोसेसर म्हणून, Exynos 850 ऑक्टा-कोर चिपसेटचा वापर या Samsung A21s मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी केला गेला आहे.

4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बॅक पॅनेलवर फोर रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, जो कंपनीच्या लेयर OneUI 2.0 सह सुसज्ज आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Samsung galaxy A21s price reduced bye 2500 rupees, check where will you get deal)

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.