Samsung F सिरीजचा पहिला 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
गॅलेक्सी एफ मालिकेतील हा सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन असेल आणि दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनीने या सिरीजसाठी फ्लिपकार्टशी भागीदारी केली आहे.
मुंबई : दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग एफ सीरीज अंतर्गत आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी F42 5G असेल. या आगामी स्मार्टफोनची माहिती सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर लाइव्ह झालेल्या पेजवरून मिळाली आहे. हा फोन भारतात 29 सप्टेंबरला लाँच केला जाईल. (Samsung Galaxy F42 5G smartphone with 64MP camera will be launch 29 September)
उद्योग सूत्रांनी आयएएनएसला याबाबत माहिती दिली. गॅलेक्सी एफ मालिकेतील हा सॅमसंगचा पहिला 5G स्मार्टफोन असेल आणि दक्षिण कोरियन स्मार्टफोन निर्माता कंपनीने या सिरीजसाठी फ्लिपकार्टशी भागीदारी केली आहे. सॅमसंगने यावर्षी गॅलेक्सी एफ पोर्टफोलिओमध्ये स्मार्टफोनची एक सिरीज लाँच केली आहे. गॅलेक्सी F42 5G भारतात लॉन्च होणारा F सीरिजचा पहिला 5G स्मार्टफोन असेल.
Galaxy F42 5G Galaxy 5G 12 बँड सपोर्टसह येईल, जो फास्ट स्पीड आणि लो लेटेन्सी सुनिश्चित करून ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. Galaxy F42 5G डिटेल्ड शॉट्स घेण्यासाठी ट्रिपल कॅमेरासह येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गॅलेक्सी F42 5G फुल एचडी+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येईल.
आणखी एक 5 जी स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज
दरम्यान, amazon.in वर लाइव्ह झालेल्या प्री-लॉन्च वेबसाइटनुसार, सॅमसंग 28 सप्टेंबर रोजी आपला अजून एक 5G स्मार्टफोन गॅलेक्सी M52 5G भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च झाल्यानंतर Galaxy M52 5G Samsung.com, amazon.in आणि निवडक किरकोळ दुकानांवर उपलब्ध होईल. अमेझॉनवर सॅमसंगने सादर केलेल्या टीझरमध्ये, गॅलेक्सी एम 52 5 जीला सर्वात स्लिम, मीनेस्ट मॉन्स्टर म्हणून संबोधले जात आहे. गॅलेक्सी M52 5G M51 पेक्षा 21 टक्के अधिक आकर्षक आहे.
सॅमसंगची एम मालिका मोठ्या बॅटरी पॅक आणि फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 778 जी प्रोसेसरसह येण्याची अपेक्षा आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे ती 7.4 मिमी स्लीक डिझाइनसह येईल. गॅलेक्सी M52 5G 6.7 फुल एचडी+ स्मोल्ड डिस्प्लेसह येऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल अशी अपेक्षा आहे.
याचे डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 5 च्या संरक्षणासह येऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज स्पेस असेल. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप 64 MP + 12 MP + 5 MP कॅमेरा सेन्सरसह येऊ शकतो. हा फोन Android 11 वर चालेल आणि 15W फास्ट चार्जरसह येण्याची अपेक्षा आहे.
गॅलेक्सी M52 5G लाँच केल्यावर, सॅमसंग देशातील 5G पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल. गॅलेक्सी M52 5G हा सॅमसंगचा अलीकडेच लॉन्च झालेल्या गॅलेक्सी M32 5G आणि Galaxy M42 5G नंतर सॅमसंगचा तिसरा 5G स्मार्टफोन असेल.
इतर बातम्या
Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार
256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
(Samsung Galaxy F42 5G smartphone with 64MP camera will be launch 29 September)