Samsung Galaxy M53 Launch : सॅमसंगचा नवा फोन आजपासून विक्रीसाठी बाजारात, किंमत आणि फिचर्स, एका क्लिकवर

कंपनीने हा फोन परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केला आहे. तुम्ही Samsung Galaxy M53 5G 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. भारतात लॉन्च केलेला हा फोन 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे आणि 25W चार्जिंग उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M53 Launch : सॅमसंगचा नवा फोन आजपासून विक्रीसाठी बाजारात, किंमत आणि फिचर्स, एका क्लिकवर
सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर ऑफर्सचा अक्षरश: पाऊसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 8:06 AM

मुंबई : जर तुम्हाला कमी किंमतीत मजबूत कॅमेरा (Mobile Camera) असलेला 5G फोन हवा असेल तर सॅमसंगने 108MP कॅमेरा (Samsung) असलेला फोन लॉन्च केला आहे. हा फोन अतिशय कमी किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32MP सेल्फी कॅमेरा (Selfie Camera) उपलब्ध आहे. सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे, जो मजबूत फीचर्ससह येतो. कंपनीने हा फोन परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केला आहे. तुम्ही Samsung Galaxy M53 5G 25 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. भारतात लॉन्च केलेला हा फोन 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे आणि 25W चार्जिंग उपलब्ध आहे. कंपनीने हा डिवाइस Samsung Galaxy M52 5G चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च केला आहे.

किती किंमत या नव्या फोनची?

हा सॅमसंग फोन 23,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची आहे. त्याच वेळी, त्याचा 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेला फोन 25,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. Samsung Galaxy M53 5G वर, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI वर 2500 रुपयांची सूट मिळेल. हा स्मार्टफोन ब्लू आणि ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे फोन अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केले जाऊ शकतात. त्याची विक्री आज दुपदुपारी 12 वाजता Amazon वर सुरू होईल. सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार निवडक Galaxy M-सिरीज वापरकर्त्यांना 2000 रुपयांची सूट मिळेल.

कसा आहे नवा फोन?

ड्युअल सिम सपोर्ट असलेला Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.1 वर काम करतो. यात 6.7-इंच फुल एचडी + AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येते. फोनमध्ये Octacore MediaTek Dimensity 900 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 8GB पर्यंत रॅम सह येतो. यात व्हर्च्युअल रॅम एक्स्टेंशनची सुविधाही आहे. ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंगने यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याची लेन्स 108MP आहे. याशिवाय, तुम्हाला 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर मिळतात. फ्रंटमध्ये कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. त्यामुळे तुम्हाला आजपासून आणखी एका नव्या फोनचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.