बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स
सॅमसंगने नुकताच त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस 20 फॅन एडिशन हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
मुंबई : दक्षिण कोरियाई टेक कंपनी सॅमसंगने नुकताच त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस 20 फॅन एडिशन (Samsung Galaxy S20 FE ) हा स्मार्टफोन लाँच केला आहे. पावरफुल्ल स्पेसिफिकेशन्स असलेल्या या हायएंड फोनने फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये एंट्री केली आहे. या स्मार्टफोनची भारतीय बाजारातील किंमत 49,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनसाठी 16 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर (Flipkart Big Billion Days Sale) सेल सुरु होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच प्री-बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. प्री-बुकींगवेळी आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. (Samsung Galaxy S20 FE pre booking started, Company giving benefits offer)
या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 20: 9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच डिस्प्ले वर कॉर्निंग गोरिला ग्लास 3 ची सुरक्षा आहे. Galaxy S20 FE के 4 जी वेरिएंटमध्ये ऑक्टा-कोर Exynos 990 चिपसेट आहे. फोनच्या 5 जी ऑप्शन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आहे. डिव्हाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे जो बॅक पॅनल वर उजवीकडे बनलेल्या चौकोनी सेटअप मध्ये वर्टिकल शेप मध्ये आहे. या फोन मध्ये एफ/2.2 अॅपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, एफ/1.8 अॅपर्चर असलेली 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अॅपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy S20 FE स्मार्टफोनमध्ये एफ/2.2 अॅपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,500 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, त्यामुळे फोन वेगाने चार्ज केला जाऊ शकतो.
The #GalaxyS20FE is #MadeForFans like you. Here’s our tribute to you and your fellow fans who keep the fandom alive. Tag 5 of your friends (or more) with whom you share your passion for photography, colors or performance and stand a chance to win a Galaxy S20 FE!
— Samsung India (@SamsungIndia) October 11, 2020
ॉ
संबंधित बातम्या
‘Apple iPhone 12’ ची लाँचिंग तारीख ठरली, पाहा फिचर आणि किंमत
बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री
भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री
(Samsung Galaxy S20 FE pre booking started, Company giving benefits offer)