40MP सेल्फी, ग्लास बॅकसह Samsung Galaxy S22 सिरीज जानेवारीत लाँच होणार
Samsung Galaxy S22 Series Launch Update : सॅमसंग त्याच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या पुढील लाईनअपची तयारी करत आहे. कंपनी Galaxy S22 सिरीजचे अनावरण करणार आहे.
Samsung Galaxy S22 Series Launch Update : सॅमसंग त्याच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या पुढील लाईनअपची तयारी करत आहे. कंपनी Galaxy S22 सिरीजचे अनावरण करणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी जानेवारीच्या शेवटी नवीन सिरीज लाँच करु शकते. लॉन्च होण्याआधीच नवीन सीरिजच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा अंदाज लावला जात आहे. Galaxy S22 लाइनअपमधील सर्व फोन ग्लास बॅकसह येतील. त्यामुळे साहजिकच, सॅमसंगच्या चाहत्यांमध्ये या फोनची मोठी उस्तुकता आहे. (Samsung Galaxy S22 series to launch in January)
प्रसिद्ध सॅमसंग टिपस्टर आइस युनिव्हर्सने गॅलेक्सी एस 22 बद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत. त्यांनी आता गॅलेक्सी एस 22 च्या बॅटरीच्या आकाराबद्दल सांगितले आहे, त्याच वेळी त्यांनी असेही म्हटले आहे की फोन अॅपल आयफोन 13 पेक्षा लहान असेल. त्यांच्या ट्विटनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस 22 मध्ये 3700 एमएएच बॅटरी दिली जाईल. हा फोन अँड्रॉइड फ्लॅगशिपपेक्षा थोडा लहान असेल. परंतु असे म्हटले जात आहे की, त्याचा आकार त्याच्या बॅटरीसाठी परफेक्ट असेल.
कॉम्पॅक्ट स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास तर त्याची बॅटरी लहान आहे. दुसरीकडे, जर आपण सॅमसंग गॅलेक्सी एस 22 च्या किंमतीबद्दल बोललो तर हँडसेट आयफोन 13 च्या तुलनेत जास्त पॉकेट फ्रेंडली असेल. Galaxy S22 सिरीजमध्ये Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra या स्मार्टफोन्सचा समावेश असू शकतो. या तिन्ही स्मार्टफोनच्या मध्ये मागील बाजूस Gorilla Glass Victus दिसेल.
टिपस्टरने असेही म्हटले आहे की गॅलेक्सी S22 लांबीमध्ये देखील लहान असेल. त्याच वेळी, त्याचे मेजरमेंट 146.7 x 71.5 x 7.7 मिमी इतके असेल. गॅलेक्सी एस 22 हा अँड्रॉइड मार्केटमधील सर्वात कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. सॅमसंगने पूर्वी लॉन्च केलेला सर्वात कॉम्पॅक्ट स्मार्टफोन गॅलेक्सी एस 10 ई होता, ज्याची स्क्रीन साईज 5.8 इंच इतकी होती. गॅलेक्सी एस 22 ची स्क्रीन साईज 6.06 इंच इतकी असेल.
टिपस्टरने असेही सांगितले की गॅलेक्सी एस 22 मध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. हा फोन गॅलेक्सी एस 22+ आणि गॅलेक्सी एस 22 अल्ट्राच्या तुलनेत चार्जिंग स्पीडमध्ये थोडा मागे असेल. यावेळी कंपनी सॅमसंगचे GN1 आणि GN2 कॅमेरा सेन्सर गॅलेक्सी S22+ मध्ये देणार नाही. त्याऐवजी, या वेळी फोनमध्ये ISOCELL GN5 कॅमेरा सेन्सर दिला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एस 22 सिरीजमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 898 एसओसी देण्यात येईल. अंडर डिस्प्ले कॅमेरा स्मार्टफोनमध्ये दिला जाईल जो पंच होल डिस्प्लेसह येईल.
40 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
इतर अहवालांमध्ये असे सुचवले आहे की Samsung Galaxy S22 Ultra स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट किंवा Exynos 2022 सह सादर केला जाऊ शकतो. याचा प्रायमरी कॅमेरा Galaxy S21 Ultra प्रमाणेच असेल. सॅमसंग यावेळी कॅमेरामध्ये डिजिटल एन्हांसर फीचर जोडेल असे संकेत दिले गेले आहेत. तसेच, यामध्ये 40 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
इतर बातम्या
iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?
Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स
(Samsung Galaxy S22 series to launch in January)