Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लाँच होणार गॅलॅक्सी Z Fold 4 आणि Z Flip 4 फोन
सॅमसंग गॅलॅक्सी Unpacked इव्हेंटची सुरूवात संध्याकाळी 6.30 वाजता होणार असून याचे लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूब चॅनेल, सॅमसंग न्यूजरूम आणि कंपनीच्या वेबसाईटवर पहायला मिळेल. या इव्हेंटमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड 4 आणि गॅलॅक्सी झेड फ्लिज 4 फोन लाँच करणार आहे.
सॅमसंग कंपनीचा मोठा इव्हेंट गॅलॅक्सी Unpacked आज पार पडणार आहे. या या इव्हेंटमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड 4 आणि गॅलॅक्सी झेड फ्लिज 4 फोन लाँच करणार आहे. याबद्दल बरीच चर्चा सुरू असून आज या इव्हेंटमध्ये कंपनी सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड 4 (Samsung Galaxy Z Fold 4 ) आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप 4 (Galaxy Z Flip 4) फोन लाँच करणार असल्याची माहिती मिळत आहे. या दोन फोल्डेबल फोनसह कंपनी गॅलॅक्सी बड्स 2 प्रो ( Galaxy Buds 2 Pro) आणि गॅलॅक्सी वॉच 5 (Galaxy Watch 5 ) सीरीजही सादर करण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, युरोपमध्ये 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड 4 फोनची किंमत 1799 युरो ( अंदाजे 1,46,400 रुपये) असू शकते. तर 512 जीबी स्टोरेजची व्हेरिएंटसाठी युरो 1,919 युरो ( सुमारे 1,56,200 रुपये) असेल. तर गॅलॅक्सी झेड फ्लिप 4 128 जीबी स्टोरोज व्हेरिएंटची किंमत 1109 युरो ( अंदाजे 90,300 रुपये) तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 1169 युरो ( 95,100 रुपये) मोजावे लागतील.
काय आहे Galaxy Z Flip 4 चे फीचर्स
सॅमसंग गॅलॅक्सी झेड फ्लिप 4 यामध्ये ग्राहकांसाठी 6.7 इंचांचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून फोन उघडल्यावर 2.1 सेकेंडरी डिस्प्लेही आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 10 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. तसेच फोनमध्ये 3700 MAH बॅटरी असेल जी 25W फास्ट चार्जिंगसह असेल.
जाणून घ्या Galaxy Z Fold 4 फीचर्स
सॅमसंगच्या या इव्हेंटमध्ये गॅलॅक्सी झेड फोल्ड 4 लाँच होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये 2K 7.6 -इंचांचा AMOLED डिस्प्ले असेल. स्क्रीनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल अंडर-स्क्रीन सेन्सर पहायला मिळू शकेल. त्याशिवाय बाहेरील स्क्रीन 6.2 इंचांची असेल. ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आल्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूम वाला 12 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे. पुढील भागा 10 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड 4 हा फोन ब्लू-इश ग्रे कलर आणि गॅलॅक्सी फ्लिप ४ हा ब्लू कलरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.