Samsung चे Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?
सॅमसंग कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पण कंपनीचे लक्ष मिड रेंज आणि बजेट स्मार्टफोन्सवरही आहे. कंपनीच्या A-सिरीज पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.
मुंबई : सॅमसंग कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पण कंपनीचे लक्ष मिड रेंज आणि बजेट स्मार्टफोन्सवरही आहे. कंपनीच्या A-सिरीज पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. सॅमसंग कंपनी लवकरच Galaxy A33 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या स्मार्टफोनचे रेंडर्स यापूर्वी समोर आले आहेत. यासोबतच कंपनी बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A13 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारीमध्ये लॉन्च होणार्या Galaxy S22 सीरीजच्या लॉन्चनंतर या दोन स्मार्टफोनची घोषणा केली जाऊ शकते. (Samsung going to launch 2 mid range 5G smartphones in february 2022, Galaxy A33 5G Galaxy A13 5G)
91Mobiles च्या अहवालानुसार, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी खुलासा केला आहे की Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G फेब्रुवारी 2022 पर्यंत भारतात लॉन्च केले जातील. शिवाय, टिपस्टरने सांगितले की, Galaxy A33 5G देखील त्याचे आधीचे व्हर्जन, Galaxy A32 5G प्रमाणेच असेल. अशा परिस्थितीत सॅमसंगच्या नवीन फोनची किंमतही जवळपास 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
Samsung Galaxy A33 5G चे संभाव्य स्पेक्स
कंपनीने अजून Samsung Galaxy A33 5G च्या फीचर्सचा खुलासा केलेला नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुल HD + AMOLED डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन IP67 रेटिंगसह लॉन्च केला जाऊ शकतो, याचा अर्थ असा आहे की तो पाण्यात पडला तरी खराब होणार नाही. तसेच धुळीचादेखील याच्यावर परिणाम होणार नाही. हा स्मार्टफोन क्वाड-कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो आणि त्यात 13MP सेल्फी कॅमेरा देखील असू शकतो.
हा फोन 3.55mm हेडफोन जॅकसह येऊ शकतो. Samsung Galaxy A33 5G सेल्फी कॅमेर्यासह होल-पंचसह 6.4 इंचांचा फुल-एचडी+ सुपर AMOLED डिस्प्लेसह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. Samsung Galaxy A32 मार्चमध्ये लॉन्च करण्यात आला होता, त्याची किंमत 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी 21,999 रुपये आहे.
Samsung Galaxy A13 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.48 इंच एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच, हा फोन MediaTek Dimension 700 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. तसेच, यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज स्पेस मिळू शकते, तर 6 जीबी रॅम असलेले व्हेरिएंटही यात येऊ शकते.
Samsung Galaxy A13 5G चा कॅमेरा सेटअप
या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच, यात 5 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येईल. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आणि 25W फास्ट चार्जर देखील मिळेल. या सॅमसंग फोनमध्ये 3.5 मिमी जॅक देखील आहे. हा फोन टाइप सी यूएसबी पोर्टसह लाँच होईल. तसेच, यात साइड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. बॅक पॅनेलवर एक प्लास्टिक फ्रेम आहे.
इतर बातम्या
Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स
सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…
फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज
(Samsung going to launch 2 mid range 5G smartphones in february 2022, Galaxy A33 5G Galaxy A13 5G)