नवीन स्मार्टफोन घ्यायचाय? Samsung Galaxy F13 च्या ‘या’ खास फीचर्सबाबत जाणून घ्या..
ज्या युजर्सना Samsung Galaxy F13 स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी हा लेख अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. या फोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व इतर तपशिल या लेखाच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. हा स्मार्टफोन अद्याप ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध नसून तो फक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.
भारतात सॅमसंग गॅलेक्सीची एफ सीरीज (series) बाजारात दाखल झाली असून ग्राहकांकडून या सिरीजला चांगलीच पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये हा फोन चांगली स्पर्धा करेल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे. जर तुम्ही देखील या सिरीजचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अलीकडेच कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एफ 13 (Samsung Galaxy F13) नावाचा एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन (smartphone) इतका स्वस्त आहे की तो खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये स्पर्धा लागली आहे. हा स्मार्टफोन अद्याप ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध नसून तो फक्त कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.
काय असणार खास?
कंपनीने हा स्मार्टफोन हार्ड प्लास्टिक आणि मेटल वापरून बनवला आहे. या स्मार्टफोनमध्ये मजबूत बॅटरीमुळे देण्यात आल्यामुळे फोनचे वजन थोडे जास्त वाटू शकते. या स्मार्टफोनची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे आणि त्याच्या बनावटीमध्ये चांगल्या गुणवत्तेचे प्लास्टिक व मेटलचा वापर करण्यात आला आहे.
आकर्षक डिझाईन
डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनला अतिशय स्टाइलिश डिझाईन देण्यात आली आहे. एंट्री लेव्हल स्मार्टफोनपेक्षा किंचित वर असलेल्या या स्मार्टफोनला अधिक आकर्षक बनविण्यासाठी कंपनीने चांगलीच मेहनत घेतली आहे. याच्या मागील पॅनलवर तुम्हाला फिंगरप्रिंट टेक्सचर मिळते जे स्मार्टफोनवर ग्राहकाची पकड अधिक मजबूत बनवते. या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम स्टायलिश ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे.
डिसप्ले स्पेसिफिकेशन्स
डिसप्लेबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये युजर्सना 6.6 इंचाचा FHD + LCD डिसप्ले देण्यात आला आहे. हा डिसप्ले 60 Hz च्या मजबूत रिफ्रेश रेटसह येतो. AMOLED डिसप्ले नसतानाही, ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये चांगला अनुभव मिळतो.
कॅमेरा फीचर्स
ग्राहकांना स्मार्टफोनमध्ये 50 MP + 2 MP + 5MP ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यात 50 MP प्राथमिक कॅमेरा असेल आणि त्यात 5 MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या बजेट रेंजनुसार फोटोग्राफीबद्दल खूप चांगले फीचर्स देण्यात आले आहे. फ्रंट कॅमेर्यामध्ये फारशी क्लिअरिटी नसली तरी मागील कॅमेराची क्वालिटी अतिशय उत्तम आहे.