Samsung चा स्वस्त फोन बाजारात, 50MP कॅमेरा आणि 5000mAh दमदार बॅटरी

Samsung Galaxy A05 | 10 हजारांपर्यंतच्या किंमतीत सॅमसंगने नवीन धमाका केला आहे. या रेंजमधील ग्राहकांसाठी हा स्वस्त स्मार्टफोन आणण्यात आला आहे. किती आहे सॅमसंग गॅलेक्सी ए05 ची किंमत, माहिती आहे का? काय आहे यामधील खास फीचर, घ्या जाणून, ग्राहकांसाठी आणला खास फोन...

Samsung चा स्वस्त फोन बाजारात, 50MP कॅमेरा आणि 5000mAh दमदार बॅटरी
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 11:20 AM

नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : हँडसेट निर्माता कंपनी Samsung ने बाजारात धमाका केला आहे. ही कंपनी ग्राहकांसाठी भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोन घेऊन आला आहे. Samsung Galaxy A05 बाजारात दाखल झाला आहे. यामुळे ग्राहकांची चांदी होणार आहे. Galaxy A05 मध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि एचडी प्लस पॅनलसह दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. हा फोन लाँच करण्याच्या एक महिनापूर्वी कंपनी Samsung Galaxy A05s बाजारात घेऊन आली आहे. दोन्ही फोनचे डिझाईन जवळपास सारखेच आहे. पण फीचर्समध्ये फरक आहे. गॅलेक्सी ए05 ची किंमत काय आहे? त्याचे फीचर काय आहेत, घ्या जाणून…

Samsung Galaxy A05 ची किंमत तरी किती

या नवीन सॅमसंग मोबाईलचा 4GB/64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. तर 6GB/128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत दाम 12 हजार 499 रुपयांपर्यत आहे. हे डिव्हाईस ब्लॅक, लाईट ग्रीन आणि सिल्व्हर रंगात खरेदी करता येईल. या रेंजमध्ये हा जोरदार फोन ठरु शकतो. ग्राहकांना कमी बजेटमध्ये हा चांगला सौदा ठरु शकतो.

हे सुद्धा वाचा

Samsung Galaxy A05 फीचर्स काय

  1. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचमध्ये एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. तो 1600 X 720 पिक्सल रिझॉल्यूशनसह येतो. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी हा बजेट फोन आहे. यामध्य मीडियाटेक जी85 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.
  2. अँड्रॉयड 13 वर आधारीत वन युआय 5.1 कोर ऑपरेटिंग सिस्टमवर हा स्मार्टफोन काम करतो. या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढवता येते.  हा दमदार फोन युझर्सला फायदेशीर ठरेल. त्यांना गेमिंग खेळण्यासाठी पण मदत होईल. बजेट कमी असेल तर हा स्मार्टफोन चीनच्या फोनपेक्षा चांगला ठरू शकतो.
  3. याचा कॅमेरा पण जबरदस्त आहे. मोबाईलच्या मागील भागात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सोबतच 2 मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आणि एक समोरील कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल कॅमरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.
  4. 25 व्हॅट फास्ट चार्ज सपोर्टसह या मोबाईलमध्ये 5000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युएल बँड वाय-फाय, 4जी, जीपीएस, ब्लूटूथ व्हर्जन 5.3, चार्जिंग आणि डाटा ट्रान्सफरसाठी युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.