Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल

Samsung कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, लवकरच ते गॅलेक्सी S21 सीरिज लाँच करणार आहेत.

Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 4:52 PM

मुंबई : Samsung कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, लवकरच ते गॅलेक्सी S21 सीरिज लाँच करणार आहेत. या स्मार्टफोन्सचे लाँचिंग काही दिवस दूर आहे, तत्पूर्वी काही दिवसांपासून सॅमसंगच्या स्मार्टफोन लाईनअपबाबत काही लीक्स समोर येत आहेत. Samsung च्या या सीरिजमध्ये गॅलेक्सी S21, S21 प्लस आणि S21 अल्ट्रा हे तीन स्मार्टफोन असतील. या सीरिजमधील S21 अल्ट्रा हा खूप महागडा स्मार्टफोन असणार आहे, कारण हा गोल्ड एडिशन स्मार्टफोन असणार आहे. (Samsung uses 750 grams of gold in Galaxy s21 ulta)

Caviar ही एक अशी कंपनी आहे, ज्या कंपनीने आतापर्यंत अनेक टेक डिव्हाईसेस गोल्ड व्हर्जनमध्ये सादर केली आहेत. त्यांनी आतापर्यंत हेडफोन्स, गेमिंग कन्सोल आणि अनेक स्मार्टफोन्सचं गोल्ड व्हर्जन सादर केलं आहे. कंपनीने अद्याप सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा या स्मार्टफोनच्या गोल्ड व्हर्जनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर Samsung Galaxy s21 Ultra या स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड असं एक पेज तयार केलं आहे. ज्या पेजवर या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलचा एक फोटो पाहायला मिळतोय.

गॅलेक्सी S21 अल्ट्राच्या मागच्या बाजूला 4 सेन्सर दिसत आहेत. Caviar एडिशनमध्ये कंपनीचा लोगो एका रेक्टँगल डिझाईनमध्ये देण्यात आला आहे. या फोनची केस अल्ट्रा ड्युरेबल PVD कोटिंगसह येते. जी पूर्णपणे गोल्डमध्ये बनवण्यात आली आहे. त्यातच 21 नंबरचं डिझाईन तयार करण्यात आलं आहे. फोनमधील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या फोनसाठी कंपनीने तब्बल 750 ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. या फोनची किंमत तब्बल 56 लाख रुपये इतकी आहे. इतकी जास्त किंमत असणारा हा जगातील पहिलाच फोन असू शकतो.

Caviar च्या वेबसाईटवर या फोनबाबत कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पंरतु लीक झालेल्या फोटोंवरुन कळतंय की फोनच्या उजव्या बाजूला वॉल्यूम (आवाज) आणि पॉवर बटण देण्यात आलं आहे. फोनची डावी बाजू प्लेन आहे. सॅमसंग गॅलेक्सी S21 सीरिज पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केली जाईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु कंपनीने लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.

सॅमसंग आणणार तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन

मोबाईलमधील कॅमेरा हा आजच्या काळात अनेकांच्या जीवनाश्यक घटकांपैकी एक बनला आहे. आयुष्यातील कोणत्याही चांगल्या क्षणांना आठवण म्हणून कैद करुन ठेवण्यात मोबाईलचा कॅमेरा उपयोगी पडतो. त्यामुळेच आता सर्वाधिक लोक चांगल्या क्वालिटीचा आणि जास्त मेगापिक्सचा कॅमेरा असलेला मोबाईल खरेदी करतात. लोकांची ही मागणी सॅमसंग पूर्ण करणार आहे. कारण सॅमसंग कंपनी आता 100 किंवा 200 नाही तर तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल तयार करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

लोकांनी आतापर्यंत 100 मोगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल वापरला आहे. मात्र, तब्बल 600 मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणजे एक चमत्कारच मानला जाईल. कॅमेरा सेन्सर जितका मोठा असेल तितकीच व्हिडीओची क्वालिटीदेखील चांगली असेल. 600 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यात आपण 4K आणि 8K पर्यंत झूमकरुन व्हिडीओ रेकॉर्ड करु शकतो.

दरम्यान, मोबाईलचा कॅमेरा 600 मेगापिक्सलची असेल तर त्या फोटोची साईज देखील तितकीच मोठी असेल. याचा अर्थ जास्त मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये मेमरी देखील जास्त हवी. सॅमसंग देखील याबाबत विचार करुनच स्मार्टफोनची निर्मिती करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सॅमसंगने अशाप्रकारच्या मोबाईल निर्मितीसाठी काम सुरु केलं असलं तरी या मोबाईलला मार्केटमध्ये येण्यास बराच वेळ लागू शकतो. दरम्यान, सॅमसंगकडून सध्यातरी 600 मेगापिक्सल कॅमेऱ्याबाबत अधिकृत अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही (Samsung may be working on a 600mp camera sensor).

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

Nokia लवकरच 4500mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणारे तीन नवे स्मार्टफोन लाँच करणार?

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

जगातला सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन 11 जानेवारीला लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Samsung uses 750 grams of gold in Galaxy s21 ulta)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.