50MP कॅमेरा, फास्ट चार्जिंगसह Samsung सर्वात स्वस्त 5G फोन लाँच करणार
दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग नवीन परवडणारा 5G फोन आणण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy A13 5G आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या मोबाईलचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत.
मुंबई : दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग नवीन परवडणारा 5G फोन आणण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव Samsung Galaxy A13 5G आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या मोबाईलचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. प्राइस सेगमेंटबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 20 हजार रुपयांच्या आत लॉन्च केला जाईल आणि या फोनची बाजारात रियलमी X7, Xiaomi Mi 10i सारख्या स्मार्टफोनशी टक्कर होईल. चला तर मग सॅमसंगच्या या आगामी 5G फोनबद्दल जाणून घेऊया. (Samsung will launch cheapest 5G phone with 50MP camera and fast charging)
सॅमसंगने गेल्या वर्षी गॅलेक्सी ए 12 लाँच केला आणि आता त्याचं अपग्रेडेड व्हेरिएंट सॅमसंग गॅलेक्सी ए 13 5 जी येत आहे. हा स्मार्टफोन काही काळापासून सतत चर्चेत होता आणि आता या फोनचे रेंडर्स समोर आले आहेत. हे टिपस्टर Steve Hemmerstoffer (@onleaks) द्वारे शेअर केले आहेत. रेंडर्सनुसार, हा फोन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येईल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.
ट्विटनुसार, बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, पण यात कॅमेरा बंप नाही. लेन्सची माहिती ट्विटमध्ये अद्याप देण्यात आलेली नसली तरी. या सॅमसंग फोनमध्ये 3.5 मिमी जॅक देखील आहे. हा फोन टाइप सी यूएसबी पोर्टसह लाँच होईल. तसेच, यात साइड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. बॅक पॅनेलवर एक प्लास्टिक फ्रेम आहे.
Samsung Galaxy A13 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.48 इंच एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच आहे. तसेच, हा फोन MediaTek Dimension 700 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. तसेच, यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज स्पेस मिळू शकते, तर 6 जीबी रॅम असलेले व्हेरिएंटही यात येऊ शकते.
Samsung Galaxy A13 5G चा कॅमेरा सेटअप
या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच, यात 5 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येईल. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आणि 25W फास्ट चार्जर देखील मिळेल.
इतर बातम्या
Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश
दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय
Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?
(Samsung will launch cheapest 5G phone with 50MP camera and fast charging)