SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यास ग्राहकांकडून शुल्क

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहे (SBI bnak change ATM Rules).

SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यास ग्राहकांकडून शुल्क
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 6:15 PM

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत (SBI bnak change ATM Rules). मेट्रो शहरातील नियमित बचत खातेधारकांना एटीएममधून महिन्याला आठ वेळा ट्रॅन्झॅक्शन करण्याची सुविधा दिली आहे. मोफत ट्रॅन्झॅक्शन करण्याची मर्यादा संपल्यावर त्यापुढील ट्रॅन्झॅक्शनवर ग्राहकांकडून पैसे वसूल केले जातील, अशी माहिती एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर दिली आहे. त्यासोबत खात्यात पैसे नसतानाही तुम्ही ट्रॅन्झॅक्शन केले आणि ते फेल झाले तर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे (SBI bnak change ATM Rules).

एसबीआयने एका महिन्यात आपल्या नियमीत बचत खातेधारकांना आठ मोफत ट्रॅन्झॅक्शन करण्याची सुविधा दिली आहे. ज्यामध्ये पाच एसबीआय आणि तीन दुसऱ्या एटीएमसाठी ट्रॅन्झॅक्शन दिले गेले आहेत. तसेच मेट्रो शहरा व्यतिरीक्त इतर ठिकाणी 10 ट्रॅन्झॅक्शन मोफत दिले आहेत. यामध्ये पाच ट्रॅन्झॅक्शन एसबीआय बँकेसाठी तर इतर पाच दुसऱ्या बँकांसाठी दिले आहेत.

बँकेच्या बचत खात्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे महिन्याला ठेवत असतील, अशा खातेधारकांना स्टेट बँक ग्रुप (SBG) आणि इतर बँकाचे एटीएमच्या ट्रॅन्झॅक्शनसाठी अमर्यादीत ट्रॅन्झॅक्शनची सुविधा दिली जाते.

एटीएम ट्रॅन्झॅक्शन चार्ज

जर एखाद्या खातेधारकाच्या खात्यात पैसे नसतील आणि अशावेळी कोणतेही ट्रॅन्झॅक्शन जर फेल झाले, तर त्या खातेधारकावर एसबीआय 20 रुपयांचे शुल्क+GST वसूल करेल. म्हणजेच एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण खात्यात पैसे नसल्याने ट्रॅन्झॅक्शन फेल झाले तर तुम्हाला शुल्क भरावे लागणार.

संबंधित बातम्या :

एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार

ना पक्ष पाहतो, ना राजकीय हितसंबंध; भाजपबाबत नरमाईच्या आरोपांवर फेसबुकचे स्पष्टीकरण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.