AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Scam Alert : हा मॅसेज करेल तुम्हाला कंगाल, लागलीच करा डिलिट, सरकारने काय दिला अलर्ट

Spam Message Alert : ऑनलाईन व्यवहारांमुळे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. एसएमएस, ई-मेल यामाध्यमातून अनेकांना गंडा घातल्या जात आहे. त्यामुळे कोणत्याही लिंकवर लागलीच क्लिक करुन तुमची महत्वाची माहिती देऊ नका, हा मॅसेज आला असेल तर लागलीच डिलिट करा.

Scam Alert : हा मॅसेज करेल तुम्हाला कंगाल, लागलीच करा डिलिट, सरकारने काय दिला अलर्ट
Scam Alert
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 10:52 AM

तुमची केव्हापण ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अति घाई संकटात नेई ही म्हण विसरु नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करु नका. कोणालाही ओटीपी शेअर करू नका. कारण ग्राहकांच्या स्मार्टफोन हातात असला म्हणजे सायबर भामट्यांचे अर्धे काम हलके होते. त्यांना जास्त मेहनत करावी लागत नाही. त्यांना केवळ जाळे फेकून ग्राहकांची वाट पाहावी लागते. तेव्हा तुम्ही सावज होऊ नका, सावध राहा. देशात हजारो लोकांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. ते ऑनलाईन स्कॅमचे शिकार होता. आता सरकारची संस्था सायबर दोस्तने पण एक अलर्ट दिला आहे. असा मॅसेज आला असेल तर त्यावर अजिबात क्लिक करु नका.

लोकांना पाठवण्यात आलाय मॅसेज

सायबर दोस्तने या नवीन फसवणुकीच्या जाळ्याविषयी माहिती दिली आहे. त्यात स्मार्टफोनधारकांना विशेषतः iPhone युझर्सला लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आयफोन युझर्सला आयमॅसेजवर एक मॅसेज पाठवण्यात येत आहे. हा मॅसेज इंडिया पोस्ट, टपाल खात्याचा असल्याचे भासवले जात आहे. पण हा मॅसेज पोस्ट ऑफिसने पाठवलेला नाही.

हे सुद्धा वाचा

हा मॅसेज पोस्ट ऑफिसकडून पाठवण्यात आल्याचे भासवल्या जात आहे. हा मॅसेज स्मार्टफोन धारकांना येत आहे. त्यात एक लिंक आहे. त्यावर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते. हा मॅसेज टपाल खात्याकडून आल्याचे भासवत, तुमचे पार्सल आले आहे, पण चुकीचा पत्ता असल्याने, पत्ता योग्य नसल्याने ते डिलिव्हर होत नसल्याचा बनाव करण्यात येत आहे. त्यात एक लिंक देऊन युझर्सला माहिती भरण्यास सांगण्यात येत असल्याने अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

नाही तर पार्सल परत जाईल

या मॅसेजचे उत्तर पुढील 24 तासात नाही दिले तर तुमचे पार्सल परत पाठवण्यात येईल, असा इशारा मॅसेजमध्ये देण्यात आला आहे. सोबतच एक वेब लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास हॅकिंगची भीती वाढते. सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांना शिकार करत आहेत.

तुम्ही योग्य लक्ष दिले तर, या मॅसेजमध्ये इंडिया पोस्टच्या वेबसाईटचे युआरएल चुकीचे देण्यात आल्याचे दिसून येईल. तुमच्या मोबाईलवर सुद्धा असा मॅसेज आला असेल तर लिंकवर क्लिक करु नका. हा मॅसेज डिलिट करा. कोणत्याही अनोळखी मॅसेजला उत्तर देऊ नका. तुमची माहिती शेअर करु नका. अशा मॅसेजची तक्रार करा.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....