WhatsApp वर एक मेसेज करा आणि काही सेकंदात Vaccine Certificate मिळवा

गेल्या 21 महिन्यांपासून जगभरात कोरोना या साथरोगाने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे.

WhatsApp वर एक मेसेज करा आणि काही सेकंदात Vaccine Certificate मिळवा
Covid Vaccination Certificate
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 10:10 PM

मुंबई : गेल्या 21 महिन्यांपासून जगभरात कोरोना या साथरोगाने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबवली जात आहे. भारतात आतापर्यंत कोरोना लसीचे 133 कोटी डोस देण्यात आले आहेत आणि हा आकडा दररोज वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला लस मिळावी, असे सरकारचे उद्दिष्ट आहे. (Send message on WhatsApp and get Vaccine Certificate in seconds)

दरम्या, आता अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र (Covid-19 Vaccination Certificate) पाहूनच प्रवेश दिला जातो. जसे की मॉल्स, रेल्वे, चित्रपटगृह, नाट्यगृह तसेच खेळांच्या मैदानावर (स्टेडियम) केवळ लसीकरण झालेल्या लोकांनाच जाण्यास परवानगी आहे. ज्या लोकांनी लस घेतली नसेल त्यांना परवानगी मिळत नाही. मॉल्स, रेल्वे तिकीट खिडकीवर लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागते. अशा वेळी जर प्रमाणपत्र नसेल तर लोकांची भांबेरी उडते. त्यांनी लसीचा डोस घेतला असेल, पण त्यांच्याकडे लसीकरण प्रमाणपत्र नसेल तर त्यांची अडचण होते.

एक मेसेज करा आणि लसीकरण प्रमाणपत्र मिळवा

जर तुम्हाला लसीचे एक किंवा दोन्ही डोस मिळाले असतील, तर तुम्हाला कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सहज मिळू शकते. तुम्ही तुमच्या मोबाईलवर काही सेकंदात लसीचे प्रमाणपत्र मिळवू शकता.

विशेषत: प्रवासादरम्यान, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. कोविड-19 चे प्रमाणपत्र काही सेकंदात मिळवण्यासाठी तुम्ही 9013151515 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. त्यानंतर या क्रमांकावर WhatsApp मध्ये Certificate असा मेसेज टाइप करून पाठवा. तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र पीडीएफमध्ये फॉरमॅटमध्ये लगेच मिळेल.

इतर बातम्या

आता पळवाट नाही, तुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट

Samsung Galaxy S21 सिरीजवर 10 हजार पर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध, वाचा महत्वाची माहीती!

व्हॉट्सअ‌ॅप स्कॅम अलर्ट! ‘या’ फीचरचा जपून वापर करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते!

(Send message on WhatsApp and get Vaccine Certificate in seconds)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.